भारतात खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता अनेक उपक्रम राबविले जातात. मात्र दिल्लीत हे केवळ कागदोपत्रीच का? असा सवाल विचारला जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या त्यागराज स्टेडिअममध्ये आयएएस ऑफिसर संजीव खिरवार यांना त्यांच्या कुत्र्यासोबत फिरण्याकरता चक्क खेळाडूंना नियोजित वेळेच्या आधीच मैदानाबाहेर काढले, असे समोर आले आहे.
काय आहे प्रकरण
दिल्लीचे आयएएस संजीव खिरवार हे साडेसात वाजेच्या सुमारास त्यांच्या कुत्र्यासह फिरण्याकरता दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये येत असतात. त्यामुळे 7 वाजताच त्याठिकाणी सराव करणाऱ्या खेळाडूंना मैदानाबाहेर काढले जात असल्याचे समोर आले. दरम्यान या प्रकाराबाबत खेळाडूंसह प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकाराबद्दल एका कोचने माहिती दिली. त्यांनी असे सांगितले की, ‘आधी याठिकाणी साडे आठपर्यंत अॅथलिट्स सराव करत असत, पण आता 6.30 वाजल्यापासूनच मैदान रिकामं करण्यासाठी गार्डकडून सांगितले जात होते. त्यामुळे आता त्यांना 3 किमीवरील जवाहरनगर स्टेडियममध्ये जावं लागत होते. दरम्यान, संजय खिरवार यांनी असे सांगितले की, मी कधी कधी माझ्या कुत्र्याला फिरवण्यासाठी मैदानावर घेऊन जातो. पण खेळाडूंना कोणता त्रास होणार नाही, याचीही काळजी घेतो. असे म्हणत त्यांनी हे आरोप खोटे असल्याचेही सांगितले.
News reports have brought to our notice that certain sports facilities are being closed early causing inconvenience to sportsmen who wish to play till late nite. CM @ArvindKejriwal has directed that all Delhi Govt sports facilities to stay open for sportsmen till 10pm pic.twitter.com/LG7ucovFbZ
— Manish Sisodia (@msisodia) May 26, 2022
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शेअर केलेल्या या वृत्तपत्रातील बातमीत असा दावा करण्यात आला आहे की, एका प्रशिक्षकाची तक्रार आहे की, पूर्वी ते साडेआठपर्यंत प्रशिक्षण घेत असत, पण आता त्यांना सात वाजता मैदान रिकामे करण्यास सांगितले जाते, जेणेकरून अधिकारी त्यांच्या कुत्र्याला मैदानात फिरवू शकतील. तर प्रशिक्षण वेळेआधी संपल्यामुळे खेळाडूंच्या नियमित सरावावर परिणाम होत असल्याचा प्रशिक्षकाचा दावा आहे.
दिल्ली सरकारने घेतला मोठा निर्णय
दिल्ली सरकार संचालित त्यागराज स्टेडियममधील प्रशिक्षण वेळेपूर्वी संपुष्टात आणल्याच्या खेळाडूंच्या तक्रारी समोर आल्यानंतर अरविंद केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टची दखल घेत दिल्लीच्या खेळाडूंना मोठा दिलासा देत अरविंद केजरीवाल सरकारने आता दिल्लीतील सर्व स्टेडियम रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहतील अशी घोषणा केली आहे. केजरीवाल सरकारच्या या घोषणेनंतर आता खेळाडूंना रात्री दहा वाजेपर्यंत सराव करता येणार आहे.
Join Our WhatsApp Community