शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुम्ही ‘ही’ चूक तर करत नाहीत ना ?

126

शेअर बाजारात रिटेल गुंतवणूकदारास पूर्वी ब्रोकरद्वारे अतिरिक्त मार्जिन दिले जात असे, यावर डिलिव्हरी, इंट्रा डे ट्रेड करता येत असे, परंतु सेबीच्या नवीन नियमानुसार, ब्रोकरद्वारे अतिरिक्त मार्जिन फक्त शेअर्स प्लेज ठेवूनच घेता येते.

प्लेजिंग म्हणजे काय? (Pleasing )

जसे सोने गहाण ठेवून आपण कर्ज घेतो असे आपल्याकडील असलेले शेअर्स ब्रोकर्सच्या माध्यामातून गहाण ठेवून ट्रेंडिंगसाठी अतिरिक्त रकमेचे मार्जिन मिळवणे म्हणजे प्लेजिंग, डिलिव्हरी ट्रेडसाठी या मार्जिनचा वापर मात्र करता येत नाही.

( हेही वाचा: Operation Blue Star: जेव्हा भारतीय सैन्याचे रणगाडे अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात शिरले )

प्लेजिंगचे फायदे काय?

  • आपल्याच शेअर्सच्या इंट्रा डेसाठी अतिरिक्त फंड्स / मार्जिन उपलब्ध होणे.
  • या मार्जिनवर इंट्रा डे ट्रेड करुन शेअर बाजारातून फायदा मिळवता येऊ शकतो.
  • जी रक्कम अतिरिक्त मिळते ती आपली स्वत: ची नसते, उधार म्हणून मिळालेली असते. जर इंट्रा डेमध्ये तोटा झाला तर तितकी रक्कम भरावी लागते.
  • तोटा भरुन काढण्यासाठी पुन्हा इंट्रा डे व्यवहार चक्रात अडकण्याची मोठी शक्यता असते.
  • जर तोटा झाला आणि तो भरण्यासाठी पैसे नसतील, तर खात्यातील शेअर्स विकून पैसे भरावे लागतात. शेअर्स विकताना, ते तोट्यात असतील तर अधिक नुकसान होते.

का टाळावा प्लेजिंगचा मोह?

  • आपल्याकडे जितके पैसे आहेत तितकेच पैसे ट्रेडिंगसाठी लावावेत.
  • उधारीवर कधीही ट्रेड करु नये. यात होणारे नुकसान भरुन काढणे अवघड असते आणि असलेली गंगाजळी कमी होण्याची शक्यता अधिक असते.
  • सुजाण गुंतवणूकदाराने दीर्घकालीन गुंतवणूकीवर भर द्यावा आणि मार्जिन घेऊन ट्रेड करण्याचे टाळावे. यातच खरी अर्थ बाजार नीती आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.