Good News! लवकरच वाढणार पेन्शन आणि निवृत्तीचे वय, काय आहे सरकारची योजना?

217

केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढविण्याचा केंद्र सरकार विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार समितीने हा प्रस्ताव (Universal Pension System) पंतप्रधान मोदींना पाठवला आहे.

(हेही वाचा – 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यासोबतच असाही होणार फायदा, कोणाला मिळणार लाभ?)

यामध्ये देशातील लोकांची काम करण्याची वयोमर्यादा वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. यासोबतच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने असेही सांगितले की, देशात निवृत्तीचे वय वाढवण्यासोबतच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू करण्यात यावी. आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालानुसार, या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 2000 रुपये पेन्शन देण्यात यावे. या समितीने देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उत्तम व्यवस्था करण्याची देखील शिफारस केली आहे.

कौशल्य विकास होणं आवश्यक

काम करण्याचे वय वाढवायचे असेल तर निवृत्तीचे वय वाढवण्याची नितांत आवश्यकता असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसेच सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील दबाव कमी करण्यासाठी हे केले जाऊ शकते. या अहवालात ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींच्या कौशल्य विकासाबाबतही आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Indian Currency: कागदाशिवाय तयार होतात भारतीय नोटा, या मटेरियलचा होतो वापर!)

सरकारने असेही धोरण करावे

केंद्र आणि राज्य सरकारने अशी धोरणे तयार करावीत जेणेकरून कौशल्य विकास होण्यास मदत होईल, असे या अहवालात म्हटले आहे. या प्रयत्नात असंघटित क्षेत्रात राहणारे, दुर्गम भागात राहणारे, निर्वासित, स्थलांतरित ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचे कोणतेही साधन नाही अशा लोकांचाही समावेश व्हायला हवा, पण त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.