कोरोनाच्या ओमिक्रॉन स्टेनचा वाढता प्रदुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचा (युएई) दौरा रद्द केला आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातल्या अनेक देशांवर सध्या ओमिक्रॉनचे संकट घोंघावत आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
…म्हणून पंतप्रधानांचा दौरा झाला रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी नववर्षात त्यांचा हा दौरा करणार होते. आगामी 6 जानेवारीच्या आसपास त्यांचा युएई दौऱा होण्याची शक्यता होती. आगामी 2022 मधील पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता. पंतप्रधानांची दौऱ्याची तारीख निश्चित झाली नव्हती, पण ते करण्याचे काम दोन्ही देश करत होते. दोन्ही देशांमधील राजकीय संबंधांना 50 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दौरा होत होता. मात्र, अखेर ओमायक्रॉनच्या संकटामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
(हेही वाचा – सरकारची 31st ला बंपर ऑफर! अवघ्या पाच रुपयांत व्हा टल्ली…)
दुबई एक्स्पोला मोदी देणार होते भेट
या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुबई एक्स्पोला भेट देणार होते. तसेच भारत-यूएई मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी देखील करणार होते. त्यामुळे पंतप्रधानांचा हा दौरा ऐतिहासिक ठरणार होता. दुबई एक्स्पोमध्ये पंतप्रधान मोदी “इंडिया पॅव्हेलियन” ला भेट देणार होते. हा एक मोठा चार मजली पॅव्हेलियन आहे, जो भारताची संस्कृती, योग, आयुर्वेद आणि अंतराळ कार्यक्रम तसेच भारताची समृद्ध परंपरा आणि हाय-टेक क्षमतांचे प्रदर्शन करतो. परंतु, तुर्तास पंतप्रधानांनी आपला दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.
Join Our WhatsApp Community