चांद्रयान ३ च्या यशानंतर शास्त्रज्ञाचे अभिनंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूमध्ये दाखल झाले आहेत. मोठ्या रोड शोद्वारे त्यांचे इस्रोच्या मुख्यालयात आगमन झाले. या वेळी इस्रोचे प्रमुख यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
(हेही वाचा : Chandrayaan 3च्या प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर 8 मीटर पर्यंतचा केला प्रवास)
२३ ऑगस्ट या दिवशी चंद्रयान ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले, त्या आनंदाच्या क्षणी पंतप्रधान मोदी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होते. त्यांनी live प्रक्षेपणाद्वारे या क्षणाचा आनंद घेतला होता. त्या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, शक्य असल्यास चंद्रयान ३ च्या यशाबद्दल वैयक्तिकरित्या अभिनंदन करू. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ ऑगस्ट या दिवशी २ देशांचा दौरा संपवून ग्रीसच्या पूर्वनिर्धारित दौऱ्यावरून दिल्लीला जाण्याऐवजी आधी थेट कर्नाटकातील बंगळुरूला आले आहेत.
बंगळुरूमध्ये पोहोचल्यानंतर मोठा रोड शो करण्यात आला. या वेळी बंगळुरूवासियांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. बंगळुरूवासियांनी तिरंगा ध्वज फडकावून, फुले उधळून पंतप्रधानांचे स्वागत केले. या वेळी युवा वर्ग मोठ्या प्रमाणात दिसून आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community