हुतात्मा दिनी पंतप्रधान करणार ‘बिप्लोबी भारत गॅलरी’चे उद्घाटन!

160

हुतात्मा दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल, कोलकाता येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिप्लोबी भारत गॅलरीचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील. व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये असलेल्या बिप्लोबी भारत गॅलरीत स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. ही गॅलरी अतिशय सुंदर पद्धतीने बनवण्यात आली असून त्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत.

या गॅलरीचा नेमका उद्देश काय?

क्रांतिकारी चळवळीला चालना देणारी राजकीय आणि बौद्धिक पार्श्वभूमी बिप्लोबी भारत गॅलरीमध्ये बघायला मिळते.  त्यामध्ये क्रांतिकारी चळवळीचा जन्म, क्रांतिकारक नेत्यांच्या महत्त्वाच्या संघटनांची निर्मिती, चळवळीचा प्रसार, भारतीय राष्ट्रीय सैन्याची निर्मिती, नौदल विद्रोहाचे योगदान यासारख्या महत्त्वपूर्ण घटनांची माहिती जाणून घेण्यास मदत होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.