मोदी-बायडेन यांच्यात चर्चा: चीनच्या आक्रमकतेवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मोठे वक्तव्य

128

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात सोमवारी व्हर्च्युअल बैठक झाली. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या चर्चेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असताना ही चर्चा होत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या चर्चेचे फलदायी परिणाम मिळतील, ज्यामुळे शांतता प्रस्थापित होईल, अशी भारताला आशा आहे, असे ते म्हणाले. दोन्ही देशांनी बैठकीत सर्वात जास्त रशिया आणि युक्रेन युद्धावर भर दिल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान भारताने युक्रेनमधील बुचा येथे झालेल्या नरसंहाराचा निषेध केला. बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्धावर चिंता व्यक्त केली आणि हल्ले तात्काळ रोखण्याची विनंती केली. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात झालेल्या या आभासी बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर उपस्थित होते.

(हेही वाचा – ऑनलाईन शिक्षणासाठी आता डिजिटल विद्यापीठ! विद्यार्थ्यांना होणार फायदा)

युक्रेनमधील नागरिकांच्या हत्येबद्दल चिंता

या बैठकीत युक्रेनमधील बुचा येथील निष्पाप नागरिकांची हत्या चिंताजनक आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी भारताने केवळ निषेधच केला नाही तर निष्पक्ष तपासाची मागणीही केली. त्याच वेळी, अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन म्हणाले की, या युद्धाच्या अस्थिर परिणामांना तोंड देण्यासाठी भारत आणि अमेरिका संपर्कात राहतील. सोमवारी रात्री उशिरा दोन्ही देशांमध्ये चर्चेची दीर्घ फेरी सुरू झाली. चार टप्प्यांत होणाऱ्या या चर्चेला दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये खूप महत्त्व दिले जात आहे. पहिल्या टप्प्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांच्यात चर्चा झाली, ज्यामध्ये अमेरिकेने चीनच्या वाढत्या आक्रमक वृत्तीविरोधात भारताला संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले.

मोदी आणि बायडेन यांची भेट

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, मी युक्रेन आणि रशियाच्या अध्यक्षांशी बोललो आहे आणि त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी थेट बोलण्याची सूचना केली. भारताने युक्रेनच्या लोकांना पाठवलेल्या मानवतावादी मदतीचे स्वागत करतो, असे बायडेन म्हणाले.

चीनबाबत अमेरिकेचे मोठे वक्तव्य

यूएस स्टेट डिपार्टमेंटने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, इंडो-पॅसिफिक क्षेत्राची सुरक्षा आणि कायद्याचे राज्य वाढवण्यासाठी अमेरिका भारत आणि क्वाड भागीदारांसोबत काम करत राहील. अमेरिकेने असेही म्हटले, ते आर्थिक पुनर्प्राप्ती आणि हवामान बदल यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत आणि त्याच्या क्वाड भागीदारांसोबत काम करत राहणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.