जगातील ‘या’ १३ राष्ट्रप्रमुखांना मागे टाकून मोदी पुन्हा सर्वात लोकप्रिय नेते

अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म 'द मॉर्निंग कन्सल्ट'च्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता रेटिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह जगातील 13 राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले आहे.

144

जगभरातील अनेक नेत्यांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक स्तरावरील सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. अमेरिकेतील ग्लोबल लीडर अॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी यांना सर्वाधिक मते मिळाली आहे.  त्यांच्याखालोखाल मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी दुसरे तर इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी यांनी तिसरे स्थान पटकाविले आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर स्पर्धेत अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनी या देशाचे नेतेही सहभागी होते. मात्र अखेरीस ७१ टक्के मिळवत पंतप्रधान मोदी यांनी पहिले स्थान पटकाविले आहे.

अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म ‘द मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता रेटिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह जगातील १३ राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले आहे.

(हेही वाचा – मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर किती अधिकार? काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय)

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी – ७१ टक्के
  • मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर – ६६ टक्के
  • इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅगी -६० टक्के
  • जपानचे पंतप्रधान फुमिओ किशीदा -४८ टक्के
  • जर्मनीचे ओलाफ शुल्त्स – ४४ टक्के
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन – ४३ टक्के
  • कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो – ४३ टक्के
  • ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन -४१ टक्के
  • ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो – ३७ टक्के
  • फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन – ३४ टक्के
  • ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन – २६ टक्के

दरम्यान या सर्वेक्षणासाठी १३ ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान माहिती जमा करण्यात आली होती. मुलाखतीद्वारे ही माहिती जमा करुन दर आठवड्याला या माहितीत भर टाकली जाते. त्यानुसार मग सर्वेक्षम करुन ही टक्केवारी काढली जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.