पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे जाहीर सभेनंतर अंधेरी येथे मेट्रो-2 ए आणि 7 चे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी गुंदवली ते मोगरा पाडा असा प्रवासही केला. ही सेवा फार पूर्वीच सुरू व्हायला हवी होती, पण राज्यात नेतृत्व बदलाचा फटका मेट्रोलाही बसला. पश्चिम उपनगरांसाठी गुरुवारचा दिवस खास ठरला. अंधेरी ते दहिसर आणि दहिसर ते डीएन नगर दरम्यान मेट्रोने प्रवास करणे शक्य झाले तेव्हा. मेट्रोच्या या मार्गाचे कामकाज सुरू झाल्याने या मार्गावरील प्रवाशांना वाहतूकमुक्त प्रवासाचा आनंद मिळणार आहे. मेट्रो 2-ए चे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोने प्रवास केला. यावेळी पंतप्रधानांनी तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांशी संवादही साधला. पंतप्रधानांनी गुंदवली ते मोगरा पाडा असा प्रवास केला. यावेळी पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
पंतप्रधानांनी मेट्रो कामगारांची भेट घेतली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मेट्रो प्रवासाच्या दरम्यान मेट्रो प्रकल्पाची उभारणी करण्यात योगदान दिलेल्या कामगारांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी कामगारांशी सविस्तर चर्चा केली.
(हेही वाचा शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचे कौतुक करणा-या जाहिराती ‘सामना’त)
मेट्रो-2 दीर्घ प्रतीक्षेनंतर सुरु
मुंबईतील पहिली मेट्रो म्हणजेच मेट्रो-1 जून 2014 मध्ये सुरू झाली. त्यानंतर १९ जानेवारी २०२३ रोजी मेट्रो-२एचे संपूर्ण कामकाज सुरू झाले. मात्र, मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7चे अर्धवट कामकाज २०२१ साली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात केले होते. मुंबईच्या मेट्रोमध्ये २ एक्स्टेंशन लाईन्ससह एकूण १४ कॉरिडॉर आहेत. मुंबई मेट्रो-2 दोन भागांमध्ये आहे, त्यात मेट्रो-2A आणि मेट्रो-2B. त्या दोन्ही लाईनचे अंतर ४२ किमी आहे. मेट्रो-2A च्या मार्गावर १७ स्थानके असलेला दहिसर-चारकोप-DN नगर दरम्यान एकूण 18 किलोमीटर अंतर आहे, तर मेट्रो-2 बी विभाग डीएन नगर-बीकेसी-मानखुर्दला जोडेल, त्याचे अंतर 23.5 किमी आहे.
मेट्रो-7 दोन वर्षे उशिरा धावली
मुंबई मेट्रो-7 चे एकूण अंतर 33.5 किमी आहे. ही लाईन दहिसर ते अंधेरी आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडेल. या मार्गावर एकूण २९ स्थानके आहेत.
Join Our WhatsApp Community