G20: मोदींशी भेट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऋषी सुनक यांनी भारतीयांसाठी केली मोठी घोषणा!

इंडोनेशियामधील बाली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी २० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची भेट घेतली. या परिषदेदरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऋषी सुनक यांनी भारतीयांसाठी मोठी घोषणा करत मोठा निर्णय घेतला.

(हेही वाचा – तुम्ही इंस्टा रिल्समध्ये चित्रपटाचे म्युझिक वापरत आहात का? ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र नोदींची भेट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्रिटन सरकारने भारतीयांसाठी दरवर्षी तब्बल ३ हजार व्हिसा जारी करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे ब्रिटनमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरूणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

ब्रिटन सरकारने या योजनेचा फायदा मिळणारा भारत पहिला देश असल्याचे सांगितले आहे. या निर्णयाने युके-भारत यंग प्रोफेशनल स्कीमवर शिक्कामोर्तब झाले आहे, असे ब्रिटन सरकारने आपल्या निवदेनात म्हटले आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी १८ ते ३० वयोगटातील ३००० प्रशिक्षित तरूण दोन वर्षांसाठी ब्रिटनमध्ये वास्तव्यासह नोकरी देखील करू शकतात. या योजनेच्या घोषणेमुळे दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वासही ब्रिटन सरकारने व्यक्त केला आहे.

जी-२० परिषद होण्यापूर्वी ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याबद्दल मोदींनी फोन करुन त्यांना पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल सुनक यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर जी-२० परिषदेत या दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी भेट घेतली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हा चर्चेचा विषय ठरला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here