पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा; कडक पोलीस बंदोबस्त 

147

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबईतील रस्त्यावर मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. ९०० पोलीस अधिकारी तसेच सुमारे साडेतीन हजार पोलीस अंमलदारांना तैनात करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात ड्रोनबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच वाहतूक विभागाकडून बीकेसी, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला आहे.

सत्ताबदला नंतर प्रथमच मोदींची सभा

सत्ताबदल झाल्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी यांचे मुंबईत आगमन होत असून त्यांच्या सुरक्षेत कुठलीही कसूर सोडण्यात आलेली नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या कडून सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  गुरुवारी मुंबई येत असून त्यांच्या हस्ते  बीकेसी येथे मेट्रो ७ च्या उदघाटन करण्यात येणार असून बीकेसी येथून जोगेश्वरी दरम्यान ते मेट्रोतून प्रवास करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी मुंबईत गुरुवारी सकाळपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलीस दलाचे ९००पोलीस अधिकारी आणि सुमारे साडे तीन हजार पोलीस अंमलदार बंदोबस्त कामी तैनात करण्यात आले आहे.

या दरम्यान मुंबई पोलिसांकडून मुंबई शहरासह उपनगरात  ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्टचा वापरावर २४ तास बंदी आणण्यात आली असून कलम १४४लागू करण्यात आला आहे.

बीकेसी येथील एमएमआरडीए मैदान या ठिकाणी येथील कार्यक्रमासाठी पंतप्रधान उपस्थित राहणार असल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून येथील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे.  सर्वसाधारण जनतेची गैरसोय टाळण्यासाठी गुरुवारी सकाळी साडेचार ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थापनामध्ये खालील प्रमाणे बदल तात्पुरते बदल करण्यात येत आहेत.

तसेच दिनांक गुरुवार रोजी दुपारी १२.०० ते रात्रौ २१.०० वा. पर्यत पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग व सर्व रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. (तथापि, यामधून रुग्णवाहिका, शाळेच्या बसेस व इतर बसेस यांना वगळण्यात येत आहे.)

बदल करण्यात आलेले मार्ग

१)  पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलीक कडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणान्या सर्व वाहनांना फॅमीली कोर्ट जंक्शन कडून पुढे कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील. संत ज्ञानेश्वर मार्गावरून कुर्लाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना इन्कम टॅक्स जंक्शन कडून पुढे बिकेसी परिसर

२) कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.

३ खेरवाड़ी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगर कडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाण्याकरीता प्रवेशबंदी राहील.

४) सुर्वे जंक्शन व रजाक जंक्शन वरुन बिकेसी परिसर, धारावी, वरळी सिलीकच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना एमटीएनएल जंक्शन येथून प्रवेशबंदी राहील.

५) संपुर्ण बीकेसी परिसरामध्ये कोणीही त्यांची वाहने कोणत्याही रस्त्यांवर पार्किंग करणार नाहीत

पर्यायी मार्ग

१) पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सि.लींक कडून बिकेसी परिसर कुर्लाच्या दिशेने जाणारी वाहने एमएमआरडीए जंक्शन येथुन धारावी टि जंक्शन वरुन कुर्ला कडे तसेच पुर्व दृतगती मार्गाकडे मार्गस्थ होतील.

२) संत ज्ञानेश्वर मार्गावरुन इन्कम टॅक्स जंक्शन कडून पुढे बिकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने गुरुनानक हॉस्पीटल जवळ जगत विद्यामंदिर जंक्शन येथुन कलानगर मार्गे सरळ पुढे धारावी टि जंक्शनवरून पुढे कुर्ला कडे मार्गस्थ होतील.

३ )खेरवाडी शासकीय वसाहत कनाकीया पॅलेस, वाल्मीकी नगर कडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने, वाल्मीकी नगर येथुन युटर्न घेवुन (खेरवाडी या. वि. हद्दीत ) शासकीय वसाहत मार्गे कलानगर जंक्शन येथुन सरळ पुढे ( धारावी वा. चि. हद्दीत) टि जंक्शन पुढे वरून कुर्ला कडे मार्गस्थ होतील.

४) सुर्वे जंक्शन व रजाक जंक्शन वरुन पश्चिम दृतगती महामार्ग, धारावी, वरळी सिलकच्या दिशेने जाणारी वाहने सुर्वे जंक्शन, रजाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन येथुन सिएसटी रोडने मुंबई विद्यापीठ मेनगेट, आंबेडकर जंक्शन, हंसभुग्रा जंक्शन येथुन पुढे इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.

५) पूर्व दृतगती महामार्ग, चुनाभट्टीवरुन, कनेक्टर मार्गे येणारी वाहने एनएसई जंक्शन, इन्कमटॅक्स जंक्शन, फॅमीली कोर्ट, एमएमआरडीए वरून पुढे इच्छीत स्थळी मार्गस्थ होतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.