सोशल मीडियावर सुद्धा मोदीच लोकप्रिय… ‘या’ यादीत पटकावले स्थान

या यादीत जगभरातील अनेक प्रभावशाली व्यक्तिमत्वांचा समावेश आहे.

सोशल मीडियाचे जाळे संपूर्ण जगभरात पसरले आहे. केवळ सर्वसामान्यच नाही तर अनेक दिग्गज सुद्धा सध्या फेसबूक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या या जाळ्यात गुंतलेले आहेत. त्यांनी केलेल्या पोस्टचा त्यांच्या चाहत्यांवर फार मोठा प्रभाव पडत असतो.

ट्विटरच्या माध्यमातून लोकांवर प्रभाव पाडणा-या अशाच काही दिग्गजांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदींनी आपले प्रभुत्व पुन्हा एकदा सिद्ध केल्याचे अनुभवाला येत आहे. इन्टेलिजन्स कंपनी ब्रँडवॉचने एका संशोधनातून ट्विटरवरील 50 प्रभावशाली व्यक्तींची यादी तयार केली आहे. या यादीत जगभरातील अनेक प्रभावशाली व्यक्तिमत्वांचा समावेश आहे.

केवळ दोन भारतीयांचा समावेश

अमेरिकन गायिका टेलर स्विफ्टने या यादीत अव्वल स्थान पटकावले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुस-या स्थानावर आहेत. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हा यादीतील दुसरा भारतीय असून त्याने 35व्या स्थानावर आपले नाव कोरले आहे.

मोदी सर्वाधिक लोकप्रिय

पंतप्रधान मोदी सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमंच आपली छाप पाडत आले आहेत. या माध्यमातून लोकांशी जोडले गेल्याने जगभरात त्यांची लोकप्रियता ही सातत्याने वाढत आहे. याआधीही मॉर्निंग कन्सल्टने तयार केलेल्या ग्लोबल लिडर्स अप्रूव्हल रेटिंगमध्ये नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जर्मन कुलपती अँजेला मार्कल, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेऊ आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना मागे टाकले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here