उद्घाटन सोहळ्यातही मोदी जपणार महाराष्ट्राची संस्कृती!

पुण्यात मोदींचे स्वागत होणार राजबिंड्या फेट्याने

124

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्चला पुण्यात येणार आहेत. सत्ताधारी भाजपकडून मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला सोबत घेऊन देशाचा गाढा चालवत आहेत. त्यांना आपला देश महासत्ता बनवण्यासाठी अजून ताकद मिळावी. या विचाराने पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आकर्षक राजबिंडा शाही फेटा तयार केला आहे. फेट्यावर असणारे हिरे म्हणजेच आपली जनता असणार आहे. या जनतेला घेऊन मोदी पुढे जाणार आहेत. या विचारातूनच आकर्षक राजबिंड्याची निर्मिती केली असल्याचे गिरीश मुरुडकर यांनी सांगितले आहे.

(हेही वाचा – मुंबईतील पुलांचेही सौंदर्य खुलणार, असा होणार मेकअप!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, रविवारी 6 मार्च रोजी पुण्याला भेट देतील. यावेळी पंतप्रधान पुणे मेट्रो रेल्वेसह विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही ते करणार आहेत. पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले आहेत. त्याबरोबरच पुणे दौऱ्यात ज्या मार्गाने मोदी जाणार आहेत. तेथील रस्ते दुरुस्ती करण्याबरोबरच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, रस्ते स्वच्छ करणे, ओव्हर हेड केबल काढण्यासाठी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आली आहेत.

फेट्यावरील राजमुद्रा हेच आकर्षण

राजबिंड्याच्या तुऱ्यावर सूर्यफूल बसवण्यात आले आहे. या सूर्यफुलावर नयनरम्य अशी राजमुद्रा बसवण्यात आली आहे. फेट्यावरील राजमुद्राच त्याचे आकर्षण ठरत आहे.

फेट्याची वैशिष्ट्ये

  • – फेट्यासाठी कॉटन आणि सिल्क अशी दोन कपडे वापरण्यात आली आहेत
  • – क्रीम आणि लाल रंगामध्ये फेटा तयार करण्यात आला आहे
  • – फेट्याला ऑस्ट्रेलियन डायमंड वापरण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.