नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती भारतात पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. या निर्णयानुसार, सोमवारी 23 जानेवरी 2023 रोजी पराक्रम दिवस साजरा होत आहे. या दिवसाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून अंदमान निकोबार बेटांच्या समुहातील 21 मोठी बेटे ही भारताच्या परमवीर पुरस्कार विजेत्या सैनिकांच्या नावाने ओळखली जातात. बेटांच्या नामकरणाचा विधी सोमवार 23 जानेवारी 2023 ला संपन्न झाला. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमासाठी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेटांच्या नामकरणाच्या कार्यक्रमासाठी पोर्ट ब्लेअर येथे पोहोचले.
( हेही वाचा: चेन्नईतील द्रौपदी अम्मन उत्सवात कोसळली क्रेन; ३ जणांचा मृत्यू, तर १० जण जखमी )
‘या’ परमवीर चक्र विजेत्यांची नावे बेटांना
भारत पाकिस्तान युद्ध 1947-48
- मेजर सोमनाथ शर्मा
- लान्स नायक करम सिंह
- नायक यदुनाथ सिंह
- सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे
- कंपनी हवालदार मेजर पीरु सिंह शेखावत
संयुक्त राष्ट्रे शांतीसेनेची कारवाई
- कॅप्टन गुरबचन सिंह सलारिया
भारत चीन युद्ध 1962
- मेजर धनसिंग थापा
- सुबेदार जोगिंदर सिंग
- मेजर शैतान सिंह
भारत पाकिस्तान युद्ध 1965
- कंपनी क्वार्टर मास्टर अब्दुल हमीद
- लेफ्टनंट कर्नल अर्देशर तारापोर
भारत पाकिस्तान युद्ध 1971
- लान्स नायक आल्बर्ट एक्का
- फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह शेखों
- लेफ्टनंट अरुण खेतरपाल
- मेजर होशियार सिंह
सियाचीन संघर्ष 1987
- नायब सुबेदार बन्ना सिंह
भारतीय शांतीसनेची कारवाई
- मेजर रामस्वामी परमेश्वरन
कारगिलची लढाई 1999
- लेफ्टनंट मनोज कुमार पांडे
- ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव
- रायफलमन संजय कुमार
- कॅप्टन विक्रम बत्रा