PM Narendra Modi यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील वीर सावरकर यांच्या पुतळ्याला केले अभिवादन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांचे स्वागत केले.

360

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराची महायुतीची सभा शनिवार, १७ मे रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क येथे झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित हजारो जनसमुदायाला संबोधित केले. त्याआधी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेतले.

modi 7

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात असिलता राजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि रणजित सावरकर यांनी वीर सावरकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. रणजित सावरकर यांनी पंतप्रधान मोदी यांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतिकारकांचे म्युरल  दाखवले.

(हेही वाचा Narendra Modi : मोदी विकसित भारत देऊन जाईल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना दिला विश्वास)

पंतप्रधान मोदी वीर सावरकरांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी प्रयत्नरत 

पंतप्रधान मोदी हे सावरकर स्मारकाला भेट देणार आहेत, हे घोषित केल्यावर प्रसारमाध्यमांनी सकाळीच स्मारकात येऊन रणजित सावरकर यांची प्रतिक्रिया घेतली, त्यावेळी रणजित सावरकर म्हणाले, पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान सावरकर स्मारकाला भेट देत आहेत. समर्थ आणि संपन्न भारत बनवायचे वीर सावरकर यांचे जे स्वप्न होते, तेच स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नरत असणारे पंतप्रधान मोदी  (PM Narendra Modi) स्मारकाला भेट देत आहेत. वीर सावरकर यांनी आर्थिक नीती आणि सैनिकीकरणाविषयी जे विचार मांडले, त्यानुसारच पंतप्रधान मोदी कार्यरत आहेत. वीर सावरकर यांचे हिंदुत्व हे राष्ट्रीय हिंदुत्व आहे, हे हिंदुत्व टिकले तर खऱ्या अर्थाने सेक्युलॅरिझम टिकून राहील. सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता हे हिंदुराष्ट्र आले तरच शक्य होईल. त्यामुळे माझ्यादृष्टीने वीर सावरकरांच्या हिंदुत्वाचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. ‘वोट जिहाद’ हा उच्चार आज झाला असला तरी काँग्रेसने याआधीच्या प्रत्येक निवडणुकीत वोट जिहाद केला आहे. २० टक्के एकगठ्ठा मतांच्या जोरावर त्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडली. त्या २० टक्के एकगठ्ठा मतांच्या जोरावर त्यांनी इतकी वर्षे सत्ता भोगली. पण आता राष्ट्रवादी जनता व्होट जिहाद झाले तरी त्यांना उत्तर देईल, असे रणजित सावरकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.