सध्या महाकुंभमेळ्यामध्ये अमृत स्नान केलेल्या भाविकांची संख्या आता ८.२६ कोटी झाली आहे. महाकुंभाला जगभरातील हिंदूंकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) महाकुंभाला कधी भेट देणार आहेत. याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५ फेब्रुवारीला महाकुंभमेळ्याला भेट देण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा Mumbai-Pune Expressway वर तीन दिवसांचा Traffic block; कोणत्या मार्गांवर असणार वाहतूक सुरु? वाचा…)
तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही २७ जानेवारीला आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे १ फेब्रुवारीला महाकुंभमेळ्याला भेट देणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १० फेब्रुवारीला महाकुंभमेळ्याला उपस्थित राहणार आहेत. महाकुंभ सुरू होऊन ९ दिवस झाले आहेत. या काळात सुमारे ९ कोटी लोकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या महाकुंभात एकूण ६ मुख्य स्नान होणार आहेत, त्यापैकी तीन अमृत स्नान आहेत. तीन अमृत स्नानांपैकी एक आधीच झाले आहे, ज्यामध्ये सुमारे साडेतीन कोटी लोकांनी भाग घेतला होता. १३ वेगवेगळ्या आखाड्यांमधील संत आणि साधू देखील होते. महाकुंभात दररोज सुमारे १० लाख भाविक गंगा नदीत स्नान करतात. १९ जानेवारीपर्यंत ८.२६ कोटी लोकांनी संगमात स्नान केले आहे. (PM Narendra Modi)
Join Our WhatsApp Community