PM Pik Vima Yojana 2022: शेतकऱ्यांसाठी केंद्राची फायदेशीर योजना, जाणून घ्या उद्दिष्टे

88

शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2022 व रब्बी हंगाम 2022-23 पासून एका वर्षासाठी जिल्हयात राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्याअंतर्गत जिल्हयातील भात, नागली व उडीद या पिकांचा समावेश आहे. खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रक्कम भातासाठी हेक्टरी रक्कम रुपये 51760/-, नाचणीसाठी हेक्टरी रक्कम रुपये 20,000/- आणि उडदासाठी हेक्टरी रक्कम रुपये 25,000/ इतकी आहे शेतकयांनी 2 टक्के विमा हप्ता म्हणजेच भातासाठी 1035/- रुपये प्रति हेक्टर, नाचणीसाठी 2 टक्के 400/-रुपये प्रति हेक्टर व उडीद करोता 2 टक्के विमा हप्ता 500/- रक्कम प्रति हेक्टर आहे.

ही योजना कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून खरोप 2022 मध्ये योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 आहे. कर्जदार शेतकरी यांनी योजनेत सहभागी न होण्याची व विमाहप्ता कर्ज रकमेत बजावट न करण्याची सूचना बँकेला देण्याची अंतिम मुदत नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी पर्यंत असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, दिलीप नेरकर यांनी सांगितले आहे.

● योजनेची उद्दीष्टे

  1. नैसर्गिक आपत्ती, किड रोगासारख्या अकल्पिक प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
  2. पिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थीतीत शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकन्यांच्या नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
  3. कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठयात सात्यत राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासुन शेतकन्यांच्या संरक्षणाबरोबरच असुरक्षा व पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.

(हेही वाचा- मुंबईच्या जैवविविधतेला नष्ट होऊ देणार नाही, आदित्य ठाकरेंचे आंदोलनकर्त्यांना आश्वासन)

● खरीप हंगामातील जोखीमीच्या बाबी

1.हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थीतीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी झाल्यामुळे होणारे नुकसान

2. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थीतीमुळे पिकांची पेरणी हिया लावणी झाल्यामुळे होणारे नुकसान

3. पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इ. बाबीमुळे उत्पन्नात होणारी घट.

ही योजना अधिसुचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसुचित पिकांसाठी आहे. शेतकन्याने भरावयाच्या खरीप हंगामातील विमा हप्ता दर खालील प्रमाणे विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के मर्यादीत ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 करिता जोखीम स्तर सर्व अधिसुचित पिकांसाठी 70 टक्के असा निश्चीत करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.