PMSYM: ‘या’ योजनेंतर्गत दरवर्षी मिळणार 36 हजार रुपये पेन्शन! कोण आहे पात्र, कसा करायचा अर्ज?

109

आता कामगरांसह मजुरांना वृद्धापकाळात लागणाऱ्या खर्चाची चिंता करण्याची गरज नाही. कारण केंद्राने कामगरांसह मजुरांकरता विशेष योजना आखली आहे. त्या योजनेचे नाव प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असे आहे. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी चांगली योजना असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – Good News! लवकरच वाढणार पेन्शन आणि निवृत्तीचे वय, काय आहे सरकारची योजना?)

या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम मजूर आणि असंघटित क्षेत्राशी निगडित अशी अनेक कामं करणाऱ्या मजुरांना त्यांचे वृद्धापकाळ सुरक्षित ठेवण्यास सहाय्य केले जाणार आहे. या योजनेंतर्गत पेन्शनची हमी सरकार देत असून या योजनेत दररोज फक्त 2 रुपये वाचवून वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळवू शकता.

ही योजना सुरू केल्यावर या योजनेस पात्र ठरणाऱ्याला दरमहा 55 रुपये जमा करावे लागणार आहे. म्हणजेच, 18 व्या वर्षी दररोज 2 रुपये वाचवून, वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळू शकते. एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दर महिन्याला 200 रुपये जमा करावे लागणार आहे. त्यानंतर वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळेल. 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपये म्हणजेच वर्षाला 36000 रुपये पेन्शन मिळणार आहे.

योजनेसाठी कोण आहे पात्र?

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजनेअंतर्गत, कोणताही असंघटित क्षेत्रातील कामगार, ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे आणि कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नाही, तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असणं बंधनकारक आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बचत बँक अकाऊंट आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

नोंदणी कशी करणार

या योजनेत पात्र ठरल्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये योजनेसाठी नोंदणी करावी लागणार आहे. कामगार CSC केंद्रात पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात. सरकारने या योजनेसाठी वेब पोर्टल तयार केले आहे. या केंद्रांद्वारे ऑनलाइन सर्व माहिती भारत सरकारकडे जाईल. नोंदणीसाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक अकाऊंट पासबुक, मोबाइल नंबर आवश्यक असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.