आता लहान मुलांना वाहतूक नियमांचे शिक्षण! काय आहे अनोखा उपक्रम…

102

पुणे महानगरपालिकेने औंध येथील ब्रेमेन चौकातील ट्रॅफिक पार्कमध्ये १२ वर्षांखालील मुलांना वाहतूक आणि रस्ता सुरक्षा धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत शहरातील रस्त्यांचे १६० मीटर लांब आणि चार मीटर रुंद असे मॉडेल ट्रॅफिक पार्कमध्ये तयार करण्यात आले आहे. यामध्ये लघु आकाराचे वाहतूक सिग्नल, चिन्हे, रस्ता क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर, फूटपाथ आणि सायकल ट्रॅक यांचा समावेश आहे. या संपूर्ण उद्यानाभोवती ख्यातनाम कलाकार मंगेश तेंडुलकर यांची वाहतूक नियमांच्या जनजागृतीपर चित्रे लावण्यात आली आहेत. हा प्रकल्प Urban95 कार्यक्रमाचा भाग आहे.

१२ वर्षांखालील मुलांना प्रशिक्षण 

आम्ही लहान मुलांना वाहतूक नियमांचे शिक्षण देण्यासाठी उपक्रम राबवत आहोत. कोरोनामुळे या प्रक्रियेच्या अंमलबजावणीला विलंब झाला. असे पुणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजरे यांनी सांगितले. सेफ किड्स फाउंडेशन या एनजीओने मुलांसाठी दीड तासाचे वाहतूक नियम प्रशिक्षण सत्र तयार केले आहे. ट्रॅफिक पार्कला भेट देणाऱ्या मुलांना प्रथम वाहतूक नियम आणि सुरक्षितता या विषयावर लघुपट दाखविण्यात येणार आहे. या पार्कमध्ये ५० मीटरच्या पट्ट्यावर गेमिंग झोन तयार करण्यात आला आहे जिथे विद्यार्थी खेळू शकतात आणि रहदारीचे नियम शिकू शकतात. पालिकेने मुलांसाठी वेगवेगळ्या आकाराच्या २५ सायकली खरेदी केल्या आहेत. तर, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने पुणे महानगरपालिकेला, सवलतीच्या दरात दोन मिनी बस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

( हेही वाचा : आता संपूर्ण भारतभर पाईपलाईनने होणार गॅसचा पुरवठा! केंद्राचं पाऊल )

जागरूकता निर्माण करण्यासाठी उपक्रम

नागरी शिक्षण विभाग प्रत्येकी २५ बॅचमध्ये विद्यार्थ्यांना ट्रॅफिक पार्कमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवेल. दररोज तीन प्रशिक्षण सत्रे असतील आणि सुरुवातीला औंध प्रभाग कार्यालय परिसरातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. असे नागरी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. पुणे महानगरपालिकेतील शाळांमधील प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी रुपये 5 प्रवेश शुल्क आणि खाजगी शाळांचे शिक्षक आणि सामान्य लोकांसाठी प्रति विद्यार्थी 20 रुपये आकारले जातील. “नागरिकांनी आकस्मिक प्रवेश करू नये आणि पायाभूत सुविधांचे नुकसान होऊ नये म्हणून शुल्क लागू करण्यात आले आहे. लहान मुलांमध्ये वाहतूक नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे. हे विद्यार्थी मोठे झाल्यावर त्यांचे पालन करतील आणि इतरांनाही त्यांचे पालन करावे लागेल,” असे पुणे पालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.