पुणे परिवहन होणार बंद! कारण वाचून थक्क व्हाल

86

पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) बस पुरविणाऱ्या ठेकेदारांना थकीत बिलाचे पैसे न मिळाल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील निम्म्या पीएमपी बस २५ मार्चपासून बंद करण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला आहे. पीएमपीने सद्यःस्थितीत सर्व ठेकेदारांची गेल्या सहा महिन्यांतील बिले दिली नाहीत.

६० कोटी रुपये थकल्याचा दावा

२५ मार्चपर्यंत बिलाची रक्कम न मिळाल्यास सेवा देणे शक्य होणार नाही, बसची देखभाल-दुरुस्ती आणि चालकांच्या वेतनाचा आर्थिक भार ठेकेदारांनाच उचलावा लागत आहे. अशा परिस्थितीत हा खर्च पेलणे शक्य नाही. असे ठेकेदारांनी पीएमपीला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच सुमारे ६० कोटी रुपये थकल्याचा दावाही ठेकेदारांनी केला आहे. पीएमपीला सहा कंपन्यांकडून बससेवा पुरविली जात असून, त्यांच्या सुमारे एक हजार बस ताफ्यात आहेत. त्यामध्ये सीएनजी आणि ई-बसचाही समावेश आहे. या बस कंत्राटी पद्धतीने ताफ्यात दाखल करून त्यांचे प्रतिकिलोमीटर उत्पन्न निश्चित केले जाते.

(हेही वाचा राज्यपालांचा ठाकरे सरकारला आणखी एक दणका! फिरवला ‘हा’ निर्णय)

६ कोटींचा प्रस्ताव

यंदाच्या वर्षी स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यासाठी ६ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यास मान्यता देण्यात आली होती. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून पीएमपीच्या माजी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले रखडली आहेत. त्यासाठीही निधी नसल्याने ४ कोटी रुपये वर्गीकरण करण्यात आली, तरीही निधी ठेकेदारांना न दिल्याने अखेर त्यांनी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.