पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी PMPML चालकाला मारहाण

प्रातिनिधिक

पुण्यात मागच्या काही दिवसांपासून पीएमपीएमएल चालक आणि कंडक्टर यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सलग तिसऱ्या दिवशी पीएमपीएमएल चालकाला मारहाणीची घटना समोर आली आहे. दोन दिवसांपासून बसचालकाला प्रवाशांनी मारहाण केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. १६ नोव्हेंबरला पुन्हा चालक आणि एका प्रवाशामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

( हेही वाचा : बेस्ट- एसटीच्या विशेष बसेस मुंबईकरांच्या सेवेत; मेगाब्लॉकमुळे १०९६ लोकल फेऱ्या रद्द! )

स्वारगेट आगाराची बस पुणे स्टेशनच्या दिशेने जात असताना दुचारीस्वार या बससमोर आडवे आले. यावेळी दोघांमध्ये वाद सुरू झाला. बस चालकाने बाईकचालकाला हटकले त्यानंतर वाद पेटला. तरुणांनी चालकाची कॉलर पकडून चपलांनी हाणामारी सुरू केली. या प्रकरणात बस कंडक्टरनेही मध्यस्थी केली. या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इतर प्रवाशांनी ही घटना कॅमेऱ्यात शूट केली आहे.

या घटनेनंतर संबंधित तरुणावर गुन्हा दाखल झाला असून दोन दिवसांपूर्वीच सुद्धा अशीच घटना पिंपरी चिंचवड परिसरात सुद्धा घडली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here