पुण्यात PMPML चालक आणि दुचाकीस्वारामध्ये तुंबळ हाणामारी; पहा व्हिडीओ

पुण्यामध्ये PMPML बस चालक आणि दुचाकीस्वारामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरुन गोघांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. काही दिवसांपूर्वी पुण्यातून असाच एक व्हिडीओ समोर आला होता. बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये या घटनेसंबंधी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

( हेही वाचा: बेस्टच्या ताफ्यात येणार नव्या बस; पण कर्मचारी वर्गात नाराजी काय आहे कारण? )

दादागिरी संपेना

पुण्यातील दादागीरीच्या घटना संपण्याचे नावच घेत नाहीत. काही दिवसांपूर्वीच गाडी बाजुला घे, असे PMPML चालकाने सांगितल्याने, दुचाकीस्वाराने बसच्या चालकाला मारहाण केली होती. आता पुन्हा तसाच एक प्रकार समोर आला आहे.

चालकच असुरक्षित

पिंपरी- चिंचवडमध्ये तरुणांनी दादागिरी केल्याच्या घटना रोज समोर येतात. किरकोळ वादातून मारहाण, प्रेमसंबंधातून खून अशा घटनांची संख्या सातत्याने वाढत आहेत. PMPML च्या कंडक्टरला लुटल्याचा प्रकारही काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. पिंपरी- चिंचवडमधील कासारवाडी येथील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस कंडक्टरकडून 3 हजार 355 रुपये लुटल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here