सातव्या वेतन आयोगासाठी पीएमपीच्या कर्मचारी आग्रही; आंदोलनाचा इशारा

177

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी पीएमटी कामगार संघटनेने (इंटक) पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे, ही मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.

( हेही वाचा : गणपतीसाठी कोकण प्रशासन सज्ज! महामार्गावर मदतीसाठी २१ वैद्यकीय मदत केंद्रे)

आंदोलनाचा इशारा 

पिंपरी चिंचवड व पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. पीएमपीदेखील या दोन्ही संघटनांचा एक भाग आहे. पीएमपीचे १० हजार कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा आदेश काढावा, अशी विनंती पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे. सातवा वेतन आयोग लागू न केल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, अशा इशारा इंटककडून देण्यात आला आहे.

वाहक भरती 

दरम्यान, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात १६५० बसच्या माध्यमातून प्रवाशांना पीएमपीकडून सेवा दिली जाते. सध्या पीएमपीकडे ४१०० वाहक आहेत. तरीही पीएमपीला वाहकांची आवश्यकता असून यामुळेच पीएमपीकडून आता आगामी काळात दोन हजार वाहकांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमपीने निविदा प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील दोन हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.