पुणेकरांची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणा-या पीएमपीने आता केवळ 40 रुपयांत शहरभर फिरता येणार आहे. ( PMPML) एक दिवसासाठी हे दर असणार आहेत. पुणे आणि पिंपरी- चिंचवड या महापालिका हद्दीत फिरण्यासाठीही केवळ 50 रुपये आकारण्यात येणार आहेत.
पीएपीएमएलने PMPML यासंदर्भातील दरपत्रक जाहीर केले आहेत. याचा फायदा पुणेकरांसह बाहेरुन आलेल्या प्रवाशांनाही होणार आहे. विशेष म्हणजे हे पास थेट वाहकाकडूनच प्रवाशांना मिळणार असल्याने मोठी सोय होणार आहे.
पीएमपी प्रशासनाने 40 रुपयांत दिवसभर फिरा ही योजना सुरु केल्याने अनेकांचे पैसे वाचणार आहेत. याबाबत प्रवाशांना जास्तीत जास्त माहिती मिळावी आणि या सेवेचा त्यांनी लाभ घ्यावा, या हेतूने हे दरपत्रक जाहीर केले आहे.
( हेही वाचा: पुण्यातील ‘या’ भागात जाणाऱ्या PMPML बसेस होणार बंद! )
पीएमपी पासचे दर….
- ज्येष्ठ नागरिक – 40 रुपये दिवसभर
- एक दिवसासाठी प्रवासी पास – 40 रुपये
- एक दिवसासाठी प्रवासी पास ( पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्द)- 50 रुपये
- मासिक पास ( एका महापालिक हद्दीसाठी)- 900 रुपये
- मासिक पास ( दोन्ही महापालिका हद्दीसाठी- 1200 रुपये
- ज्येष्ठ नागरिक मासिक पास ( सर्व मार्गांसाठी)- 500 रुपये