-
ऋजुता लुकतुके
पोको कंपनीची एम ६ सीरिज लोकांना नवीन नाही. स्वस्तात मस्त आणि चांगले इन्फोटेनमेंट फिचर्स यामुळे हा फोन लगेचच तरुणांना आवडला. आता या सीरिजमधील प्लस ५जी फोन कंपनीने बाजारात आणला आहे. आणि या फोनची बॅटरी आहे ५३०० एमएएच क्षमतेची. तर फास्ट चार्जिंगही ३३ वॅटचं आहे. त्यामुळे एकदा चार्ज केलेला फोन ३ दिवसांपर्यंतही चालू शकेल. आणि चार्जिंगला फक्त १४ मिनिटं लागतील. (Poco M6 Plus 5G)
(हेही वाचा- Hyundai Palisade : नवीन पिढीची हयुंदे पॅलिसेड गाडी रस्त्यावर धावण्यासाठी तयार?)
त्याचबरोबर १०८ मेगा पिक्सेलचा कॅमेरा हे या फोनचं आणखी एक वैशिष्ट्य असेल. पोको एम६ पेक्षा पोको एम६ प्लसमध्ये काही महत्त्वाचे बदल आहेत. चांगल्या कामगिरीसाठी हा नवीन फोन स्नॅपड्रॅगन चौथ्या जनरेशनची ऑपरेटिंग प्रणाली आहे. आणि डिस्प्ले स्क्रीन एलसीडी असली तरी १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आहे. त्यामुळे स्क्रीनची प्रखरता पुरेशी आहे. फोनमधील प्राथमिक कॅमेरा तब्बल १०८ मेगा पिक्सेलचा आहे. त्यात सॅमसंगचा एचएम६ सेन्सरही बसवण्यात आला आहे. (Poco M6 Plus 5G)
Poco M6 Plus 5G launching today in India August 1st
6/128💰 ₹13,999
8/128 💰₹14,999
📱6.79″FHD+ LCD,120Hz RR,GG3
🦾SD 4 Gen 2AE
💾4GB/6GB+64GB/128GB
LPDDR4x | UFS 2.2
📷108MP+2MP
🤳13MP
🔋5030mAh|🔌33W
-Side mounted FPs
⭕HYperOS 1.0
🍭A14
🎧3.5mm jack #PocoM6Plus5G #POco pic.twitter.com/e1QZjPrBrU— Sûjåñ Tharu (@SujanTharu66) August 1, 2024
फोनच्या नवीन सॉफ्टवेअरमध्ये अँड्रॉईड प्रणालीही सुधारित आणि आधुनिक आहे. आईस सिल्व्हर, मिस्टी लव्हेंडर, आणि ग्रॅफाईट ब्लॅक या रंगांत हा फोन उपलब्ध आहे. (Poco M6 Plus 5G)
(हेही वाचा-Plot Rehabilitation: वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांचे नवीन भूखंडावर पुनर्वसन )
पोको एम६ प्लस फोनमध्ये एक हेडफोन जॅक, दोन सिमकार्ड ठेवण्यासाठी जागा, आयआर पोर्ट आणि मायक्रो एसडी कार्डासाठी अतिरिक्त जागा अशा सुविधा आहेत. फ्लिपकार्टवर या फोनची अधिकृत विक्री सुरूही झाली आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत १३,४९९ रुपये इतकी आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत १४.४४९ रुपये इतकी आहे. या फोनची सध्या फक्त ऑनलाईन विक्रीच सुरू आहे. (Poco M6 Plus 5G)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community