नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावरील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर भारतात ५ जी सेवेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात पनवेल पालिकेच्या पोदी येथील सावित्रीबाई फुले शाळेला याचा पहिला मान मिळाला आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रिलायन्स जिओ आणि एअरटेल हाय स्पीड ५ जी सेवेला सुरुवात झाली. या निमित्ताने पंतप्रधानांनी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्र. ८ या शाळेतील विद्यार्थ्यांशी दूरदृष्यप्रणाली द्वारे संवाद साधला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
(हेही वाचा – ‘मातोश्री’वर महिन्याला 100 कोटी जायचे, खोक्यांवरून शिंदे गटाच्या खासदाराचा खळबळजनक आरोप)
दिल्लीहून पंतप्रधान मोदी यांनी देशभरात ५ जी सेवेशी जोडलेल्या ३० शाळांसोबत एकत्रित संवाद साधला. महाराष्ट्रात पनवेलमधील पोदी शाळेत शनिवारी सकाळी दहा वाजता उपस्थित राहून मुख्यमंत्री शिंदे ऑनलाईन पंतप्रधानांशी जोडले गेले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत खुर्चीऐवजी त्यांनी विद्यार्थ्यांसह बेंचवर बसणे पसंत केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्र्यांनी ५ जीचे महत्त्व सांगितले, क्रांतिकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बँकिंग यासह सर्वच क्षेत्रात दिला. फाईव्ह जी तंत्रज्ञानाने क्रांती होणार असल्याचे म्हटले. या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. त्याचा फायदा सर्वाधिक शिक्षण क्षेत्राला होणार असून, विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. इंटरनेटला मिळणाऱ्या स्पीडचा फायदा अभ्यासासाठी करा. गेम आणि चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी नाही, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
Join Our WhatsApp Community