कै. लता मंगेशकर यांनी “ऐ मेरे वतन के लोगों” हे गाणं गायलं आणि अजरामर केलं. आजही स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनाला हे गीत गायलं जातं. या गीताचे लेखक आहे कवी प्रदीप. (Poet Pradeep) कवी प्रदीप यांचे मूळ नाव ‘रामचंद्र नारायणजी द्विवेदी’ असे होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैनमधील बदनगर येथे झाला.
१९४० मध्ये आलेल्या बंधन चित्रपटात त्यांनी गीत लिहिले आणि याद्वारे कवी प्रदीप हे नाव प्रसिद्ध झाले. मात्र त्यांना एकेकाळी तुरुंगात देखील जावे लागले होते. झालं असं की १९४३ साली त्यांनी किस्मत या चित्रपटासाठी गीत लिहिले. त्यातील “दूर हटो ए दुनिया वालों, हिंदुस्तान हमारा है” हे देशभक्तीपर गीत प्रचंड गाजले. या गाण्याचे बोल ब्रिटिश सरकारला खटकले. त्यामुळे संतप्त झालेल्या ब्रिटिश सरकारने त्यांच्या अटकेचे आदेश दिले. अटक टाळण्यासाठी कवी प्रदीप यांना भूमिगत व्हावे लागले.
(हेही वाचा – Vanchit Bahujan Aghadi ने नाना पटोलेंना युतीच्या विरोधात आहात का? असे का विचारले…)
कवी प्रदीप हे सदाबहार गीतकार होते. त्यांनी चने जोर गरम बाबू, हे मारुती सारी रामकथा साकार, चल मुसाफिर चल, भारत के लिए भगवन का एक वरदान है गंगा असे अनेक गीत लिहिले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ, मध्य प्रदेश सरकारच्या कला आणि संस्कृती विभागाने २०१३ साली कवी प्रदीप राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केली. पहिला कवी प्रदीप राष्ट्रीय सन्मान पुरस्कार (Kavi Pradeep National Honor Award) उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध गीतकार गोपालदास नीरज यांना प्रदान करण्यात आला. १९९८ रोजी भारत सरकारने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community