परभणी जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या ठिकाणी रविवारी लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून 100 हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे. या सर्वांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परभणी शहरातील दर्गा रोड येथील ही घटना आहे. ही विषबाधा झालेल्यांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात रूग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकीने न्यायालयालाच केला सवाल, म्हणाली…)
सध्या सर्वांची प्रकृती स्थिर
परभणीतील दर्गा रोड परिसरात असलेल्या मेहबूब फंक्शन हॉल येथे रविवारी संध्याकाळी एक विवाह समारंभ पार पडला. या सोहळ्यात जेवण झाल्यानंतर साधारण दीडशे लोकांना पोटदुखी, उलटी आणि मळमळ होणे असा त्रास जाणवू लागला. वेळीच सावधगिरी बाळगत या सर्वांना परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा प्रशासन रूग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.
विषबाधा नेमकी कशामुळे झाली? अद्याप अस्पष्ट
त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. हे सर्व लोकं पूर्णपणे बरे झाल्याशिवाय ही परिस्थिती पूर्वपदावर येणार नाही. तर वेळीच सावधगिरी बाळगत या सर्वांना परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. रूग्णालय प्रशासनाचीही या घटनेने झोप उडवल्याची चर्चा परभणीत होत आहे. ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली? नेमकं कोणत्या पदार्थातून विषबाधा झाली? हे अद्याप अस्पष्ट आहे. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली आहे की नाही, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही.
Join Our WhatsApp Community