नशेचे सिरप विकणा-या कुबड्याच्या पोलिसांनी धरल्या तंगड्या

जप्त करण्यात आलेल्या या सिरपची किंमत ६ लाख १४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

115

नशा आणणा-या कोडीयन कफ सिरपचा बेकायदेशीर धंदा करणाऱ्या कुबड्याला त्याच्या साथीदारांसह मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. कुरियर मार्फत आलेल्या कोडीयन कफ सिरपच्या दीड हजार बॉटल्स पोलिसांनी जप्त केल्या असून, कुबड्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुबड्याच्या आवळल्या नाड्या

गोवंडी शिवाजी नगर परिसरातील नशेचा धंदा करणारा करीम रहीम शेख उर्फ कुबड्या याला शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असता, कोडीयन हे नशेसाठी वापरण्यात येणारे कफ सिरप कुरियर ट्रान्सपोर्ट मार्फत मुंबईत येणार असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

(हेही वाचाः मुलाच्या अंत्यविधीसाठी पैसे उसने घेतले! पण ते फेडता आले नाहीत म्हणून वडिलांनी…)

६ लाख १४ हजार रुपयाचे सिरप

शिवाजी नगर पोलिसांनी सायन येथे एका ट्रान्सपोर्ट कुरियर कंपनीच्या बाहेर सापळा रचला. तिथून अंमली पदार्थ मिश्रित कोडीयन सिरपची डिलिव्हरी घेण्यासाठी मोहीन मोबीन खान याला ताब्यात घेऊन, त्याच्याजवळून दीड हजार कोडीयनच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या सिरपची किंमत ६ लाख १४ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कुबड्या आणि त्याचा साथीदार मोहीन खान या दोघांना अटक केली आहे.

(हेही वाचाः सासरच्यांच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.