सचिन वाझेचा चालक बनला माफीचा साक्षीदार!

या पोलिस चालकाला माफीचा साक्षीदार करुन, सचिन वाझे याच्या विरोधात भक्कम पुरावे तयार करण्यात येत आहेत.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याप्रकरणी, अटकेत असलेला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्या पोलिस वाहनावरील चालक सरकारी साक्षीदार बनला आहे. मंगळवारी या चालकाची साक्ष न्यायाधीशांसमोर एनआयएने नोंदवून घेतली. सचिन वाझेविरुद्ध एनआयए मजबूत पुरावे आणि साक्षीदार गोळा करत आहे. या प्रकरणात एका पोलिस अधिकाऱ्याला माफीचा साक्षीदार करण्यात येणार असल्याचे समजते.

एनआयएने नोंदवला जबाब

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्या प्रकरणी एनआयएने अटक केलेला सचिन वाझे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तळोजा तुरुंगात त्याला ठेवण्यात आलं आहे. गुन्हे शाखेच्या सीआययू मध्ये तत्कालीन प्रभारी अधिकारी असताना वाझे वापरत असलेल्या सरकारी वाहनावर चालक असलेल्या पोलिस चालकाकडे एनआयएने या प्रकरणात चौकशी केली. घटनेच्या दिवसापासून किंवा त्यापूर्वी सचिन वाझे पोलिस वाहनातून कुठे कुठे गेला होता, याबाबत पोलिस चालकाकडे चौकशी करण्यात आली असून, त्याचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.

(हेही वाचाः FDA चे आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली!)

एनआयए तयार करत आहे भक्कम पुरावे

या प्रकरणात पोलिस अधिकारी माफीचा साक्षीदार होणार असून, लवकरच त्याची साक्ष न्यायाधीशांसमोर नोंदवली जाणार असल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली. या पोलिस चालकाला माफीचा साक्षीदार करुन, सचिन वाझे याच्या विरोधात भक्कम पुरावे तयार करण्यात येत आहेत. मंगळावारी या पोलिस चालकाची किल्ला न्यायालयात न्यायाधीश यांच्यासमोर साक्ष नोंदवण्यात आली असल्याची माहिती एनआयए सूत्रांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here