बारावीचा केवळ गणिताचा नव्हे तर ‘या’ दोन विषयांचेही फुटले पेपर

175

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या बारावी परीक्षा पेपरफुटीच्या तपासात खळबळजनक माहिती समोर आली आहे. काॅपीमुक्त अभियान राज्यभरात राबवले जात असतानाच, त्याला हरताळ फासत बारावी गणिताचा पेपर फुटला. आता याबाबत आणखी खळबळजनक माहिती समोर येत आहे. गणिताच्या पेपरफुटीप्रकरणी चौकशी करत असताना, पोलिसांना गणिताव्यतिरिक्त भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन विषयांचेही पेपर फुटल्याची माहिती मिळाली आहे.

समोर आलेलल्या माहितीनुसार, 3 मार्चला गणिताचा पेपर फुटण्याआधी 27 फेब्रुवारीला फिजिक्स आणि 1 मार्चला केमिस्ट्रीचा पेपर फुटला होता. परीक्षेच्या एक तासापूर्वी व्हाॅट्सअॅपद्वारे परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना हे पेपर शेअर करण्यात आले होते, असे पुरावे सापडले आहेत.

( हेही वाचा: अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न; दोघांविरोधात गुन्हा दाखल )

तपासादरम्यान माहिती उघड

गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितल्याप्रमाणे, अहमदनगरमधील मातोश्री भागुबा भांबरा कृषी व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील व्यवस्थापन कर्मचारी आणि शिक्षकांचे मोबाईल गुन्हे शाखेने जप्त केले आहेत. त्यांच्या जप्त केलेल्या मोबाईलचा व्हाॅट्सअॅप डेटा मिळवला आहे. त्यातून गणिताव्यतिरिक्त भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे पेपर फुटले असल्याची माहिती समोर आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.