‘बॉम्बेअड्डा’ क्लबमध्ये इंजिनिअर तरुण करायचा चोऱ्या

69

सांताक्रूझ येथील ‘बॉम्बेअड्डा’ या क्लबमध्ये जाऊन महागडे मोबाईल फोन चोरी करणाऱ्या एका मॅकेनिकल इंजिनिअरला पोलिसांनी अटक केली आहे. या तरूणाजवळून पोलिसांनी अ‍ॅप्पल कंपनीचे महागडे मोबाईल जप्त केले आहेत. स्वतःच्या चैनीसाठी पगार अपुरा पडत असल्यामुळे चोरीचा मार्ग पत्करल्याचे त्याने पोलिसांच्या चौकशीत सांगितले.

सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीला शोधले

अद्वैत राजन महाडिक (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व येथील नॅशनल अव्हेन्यू बिल्डिंगमध्ये राहणारा आहे. हानतरूण एमएनसीमध्ये इंजिनीअर म्हणून काम करतो. त्याला मिळणारा पगार त्याच्या महागड्या जीवनशैलीला पुरत नसल्याने त्याने चोरीचा मार्ग पत्करल्याचे पोलिसांनी सांगितले.

( हेही वाचा : प्रशासन अलर्ट मोडवर! कोकणात मुसळधार पाऊस; वाहतूक ठप्प, नागरिकांना सतर्कतेचा इशारा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका महिन्यात बॉम्बे अड्डा येथून आयफोन चोरीला गेल्याच्या तीन घटना सांताक्रूझ पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या आहेत. क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे आरोपीला सीसीटीव्ही फुटेजमधून शोधून काढणे, पोलिसांना आव्हानात्मक होते. त्यातून पोलिसांनी एका संशयित तरुणाला शोधून काढले, व त्याच्यावर पाळत ठेवून गेल्या आठवड्यात त्याला कांदिवली येथून अटक केली. त्यांच्याजवळून अ‍ॅप्पल कंपनीचे दोन महागडे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.