आसामच्या बारपेटा जिल्ह्यातील पोलिसांनी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. अकबर अली आणि अबुल कलाम आझाद अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांचा संबंध अल कायदा आणि अंसारुल्लाह बांग्ला टीमशी असल्याचे बारपेटाचे पोलीस अधिकारी अमिताव सिन्हा यांनी सांगितले. आसाममध्ये दहशतवादी लिंक प्रकरणात पोलिसांनी गेल्या 10 दिवसांत 6 जणांना अटक केली आहे.
(हेही वाचा – न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंह अखेर पोलिसांसमोर हजर)
बारपेटा येथील एका मदरशामध्ये सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याने पोलिसांनी दखल मोहीम सुरू केली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांचे संबंधही या मदरशाशी असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, बारपेटा जिल्ह्यातून अटक करण्यात आलेल्या अकबर अली आणि दुसऱ्याचे अबुल कलाम आझाद दोघेही अल कायदा आणि अंसारुल्लाह बांग्ला टीमशी संबंधीत आहेत.
गेल्या 10 दिवसांत 6 जणांना अटक
दहशतवादी लिंक प्रकरणात पोलिसांनी गेल्या 10 दिवसांत सुमारे 6 जणांना अटक केली आहे. यापूर्वी गोलपारा येथून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या 26 ऑगस्ट रोजी पोलिसांनी गोलपारा येथील मदरशातून हाफिजुर रहमान मुफ्ती नावाच्या इसमाला अटक केली होती. त्याचा दहशतवादी संघटनांशीही संबंध होता. दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी नुकतेच आवाहन केले होते की, आम्ही काही एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) बनवल्या आहेत, जर तुमच्या गावात कोणी इमाम आला आणि तुम्ही त्याला ओळखत नसाल तर लगेच पोलीस स्टेशनला कळवा, ते पडताळणी करतील त्यानंतरच ते इथे राहू शकतात.
Join Our WhatsApp Community