पोलीस निरीक्षक खुळे यांचे बासरीचे खुळ

83

मुंबई पोलीसांची तुलना स्कॉटलॅंड पोलिसांसोबत केली जाते. गुन्हेगारी विश्वात मुंबई पोलिसांचा वचक आहे. मुंबई पोलिसांमध्ये एकापेक्षा एक असे कर्मचाऱ्यांपासून उत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जगविख्यात असे गुण आहेत. यातील काही जणांना आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळते मुंबई पोलीसांमधील रफि अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब खुळे यांच्यातील सुप्त कलाकार जागा झाला त्यांनी बासरी वादन करून उपस्थितांची मनं जिंकली.

( हेही वाचा: प्रेमविरहातून प्रेयसीची स्कुटी जाळली; आगीत गेला सात जणांचा बळी )

समाजमाध्यमावर व्हायरल 

औचित्य होते ते मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतील संडे स्ट्रीट हा उपक्रम किडवाई मार्ग पोलीस ठाणे हद्दीमधील रफी अहमद किडवाई रोड येथे राबवण्यात आला. यावेळी रफी अहमद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दादासाहेब खुळे यांनी बासरी वादन केले. त्यांचा हा व्हीडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे आणि त्यांचं कौतुकही होत आहे.

https://www.instagram.com/reel/CdTB1ZEJutl/?igshid=YmMyMTA2M2Y=

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.