सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं गढूळ झालं आहे. दिवसेंदिवस अनेक राजकीय बदल घडत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस दलाने निर्णय घेतला आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे पुणे पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. १२ जुलैपर्यंत वैद्यकीय सुट्टी वगळता इतर सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
राजकीय परिस्थितीमुळे पुण्यासह महत्वाच्या शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात पोलिसांना २८ जून ते १२ जुलैपर्यंत ऑन ड्युटी रहावं लागणार आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय वातावरणाची पार्श्वभूमी पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे पुणे पोलिस दलाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता पोलिसांना सुट्ट्या घेता येणार नाहीत.
(हेही वाचा – राज्यसभा निवडणुकीतील शिवसेनेचा पराभव काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच, उदय सामंतांचा आरोप)
दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. शिंदे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे, नोटीस बजावलेल्या बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटीशीला १२ जुलैपर्यंत उत्तर देता येणार आहे.
Join Our WhatsApp Community