आपकी जितनी पहेचान है आप वहाँ जाओ, लेकिन मुझे आपको महिने का १० लाख देना ही पड़ेगा। अभी मैंने सिर्फ २ पुलिस स्टेशन से कारवाई चालू की है, मेरे अंडर जितने भी पुलिस स्टेशन है वहाँ से कारवाई चालू करके आपके आँख में से आंसू निकाल दूँगा।
या आशयाची धमकी तत्कालीन पोलिस उपायुक्तांनी दिल्याचे पत्र अंगाडीया कुरियर सर्व्हिस चालवणाऱ्या असोसिएशनने डिसेंबर महिन्यात मुंबई अप्पर पोलिस आयुक्त यांना दिले होते, या पत्रात परिमंडळ २चे तत्कालीन पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर आरोप लावण्यात आले आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांच्यानंतर मुंबईतील हे नवे वाझे समोर आल्याचे म्हटले जात आहे.
(हेही वाचाः ‘हा’ आहे ब्लॉक कॉलर…मानसिक आजारातून तो करायचा कॉल…)
अधिका-यांवर गुन्हा दाखल
काळबादेवी येथे अंगाडीया कुरिअर सर्व्हिस चालविणाऱ्या अंगाडीयाकडून खंडणी उकळणाऱ्या लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांवर गेल्या आठवड्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून, हे प्रकरण तपासासाठी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे.
काय आहे पत्रात?
अंगाडीया असोसिएशनने डिसेंबर महिन्यात दक्षिण प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलिस आयुक्तांना या संदर्भात लिहलेले पत्र हिंदुस्थान पोस्टच्या हाती लागले आहे. या पत्रात अंगाडीया असोसिएशनने परिमंडळ २चे तत्कालीन पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी अंगाडीयाचा कसा छळ चालवला आहे, याबाबत सविस्तरपणे लिहिले आहे. पोलिस उपायुक्त त्रिपाठी यांनी अंगाडीया व्यापारी यांच्याकडून दरमहा १० लाख रुपयांची डिमांड केली असल्याचे म्हटले आहे.
(हेही वाचाः महेश मांजरेकरांना अटक होणार? न्यायालयाच्या आदेशाचा होणार का परिणाम?)
अशी चालू आहे वसुली
रक्कम मोठी असल्यामुळे अंगाडीया पोलिस उपायुक्त यांची ही डिमांड पूर्ण करण्यास असमर्थ असल्यामुळे २ डिसेंबर पासून लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्याकडून अंगाडीयाचे कुरिअर घेऊन जाणाऱ्या लोकांना उचलून मुंबादेवी पोलिस चौकीत घेऊन जाऊ लागले. ज्याच्या बॅगेत १० लाख रुपयांची रोकड असेल त्यांच्याकडे १ ते २ लाखांची मागणी करू लागले, तर ज्यांच्याकडे ५ लाख रुपये असतील त्यांच्याकडे ५० हजाराची मागणी होऊ लागली होती. अनेकांनी पोलिसांना पैसे देऊन स्वतःची सुटका करून घेतली, तर ज्यांनी पैसे देण्यास नकार दिला, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी देण्यात आली, असे पत्रात म्हटले आहे.
पत्रात धमकीची भाषा
अनेकांनी पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांची भेट घेतली असता, माझे तुमच्या असोसिएशनचे अध्यक्ष यांच्यासोबत बोलणे झाले आहे, महिन्याला १० लाख दिल्यावर कारवाई बंद होईल, असे सांगण्यात आले.
(हेही वाचाः जापनीस बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंटची आत्महत्या! हे आहे कारण…)
वारंवार पोलिसांकडून कारवाई होत असल्यामुळे कीर्ती जोशी आणि प्रजापती हे अंगाडीया पोलिस उपायुक्त यांच्या भेटीला ६ डिसेंबर रोजी गेले असता, “मैंने शुरू की हुई कारवाई से मुझे एक ही दिन में १० लाख रुपये ज्यादा मिल रहा है। मैं आपसे भीख नहीं माँग रहा हूँ। आपको मुझे उतना ही पैसा देना होगा और वो भी सप्टेंबर, २०२१ से देना होगा। आपकी जितनी पहेचान है आप वहाँ जाओ, लेकिन मुझे आपको महिने का १० लाख देना ही पड़ेगा। अभी मैंने सिर्फ २ पुलिस स्टेशन से कारवाई चालू की है, मेरे अंडर जितने भी पुलिस स्टेशन है वहाँ से कारवाई चालू करके आपके आँख में से आंसू निकाल दूँगा। अशी धमकी दिल्याचे पत्रात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community