औरंगाबादमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. औरंगाबादमधील ग्रामीण पोलिसांनी गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव हद्दीत एका व्हीआयपी जुगार अड्यावर कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत जिल्ह्यातील मोठ्या प्रतिष्ठीतांना जुगार खेळताना पकडले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर या कारवाईत तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहितीदेखील समोर आली आहे.
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलिसांनी एका खासगी फार्म हाऊसवर संयुक्त कारवाई केली. ज्यात 25 लाख रोख रक्कम व 5 चार चाकी लक्झरी गाड्यांसह एकूण 1 कोटी 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
( हेही वाचा: काँग्रेसच्या ‘या’ पाच बड्या नेत्यांना ईडीचे समन्स )
प्रतिष्ठित लोकांना जुगार खेळताना पकडले
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या कारवाईत प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे. तर काही बिल्डर आणि इतर प्रतिष्ठीत लोकांचा यात समावेश असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे एका खाजगी फार्म हाऊसवर हा जुगार अड्डा सुरु होता. त्यामुळे व्हीआयपी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर औंरगाबाद जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
Join Our WhatsApp Community