चहाचे शौकिन आहात?… तर सावधान! चहा पावडरमध्ये भेसळ करणा-या गॅंगचा पर्दाफाश

134

आपल्या देशात चहाचे शौकिन काही कमी नाहीत. ठरलेल्या वेळेला चहा हवाच, अशी अनेक माणसे आपण आपल्या आजूबाजूला पाहतोच. दिवसाची सुरुवात असो, वा कट्ट्यावरच्या गप्पा किंवा मग रेंगाळणारी संध्याकाळ… चहा हवाच. पण तुम्ही पित असलेला चहा चांगला आहे का ? तुम्ही पित असलेला चहा भेसळयुक्त तर नाही ना? असा विचार आता करावा लागणार आहे. कारण मुंबई पोलिसांनी चहा पावडरमध्ये भेसळ करणा-या भेसळ गॅंगचा पर्दाफाश केला आहे.

छापेमारी करत, भेसळयुक्त चहा केला जप्त

मुंबईतील शिवडी बंदर रस्त्यावर पोलिसांनी छापेमारी करत तब्बल 430 किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त केली आहे. या प्रकरणात राजू अबुल अजहर शेख आणि राहूल शेख या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेल्या या आरोपींकडून सध्या अधिक माहिती मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

( हेही वाचा अदानी बनले ‘सिमेंट किंग’! ‘अंबुजा आणि एसीसी’ कंपन्या केल्या टेक ओव्हर )

पोलिसांचा अधिक तपास सुरु

मुंबई पोलिसांनी चहा पावडरमध्ये भेसळ करणारे रॅकेट उद्ध्वस्त केल्यामुळे खळबळ माजली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने माहिती मिळताच, शिवडी बंदर रोडवर छापेमारी केली. या छापेमारीत तब्बल 430 किलो चहा पावडर जप्त करण्यात आली. या भेसळयुक्त चहा पावडरची किंमत तब्बल 85 हजार रुपये असल्याचे, सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.