लोणावळा फिरायला जाताय? पोलिसांची पर्यटकांवर असणार करडी नजर

88

पावसाळा सुरू झाल्याने अनेकजण पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडत होत आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात. विशेषत: मावळ तालुक्यातील लोणावळा हे तर पर्यटनाचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाते. लोणावळ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटकांची पाऊले लोणावळ्याकडे वळू लागली आहेत. वीकेण्ड असल्याने पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झालं आहे.

शहरात ३ ठिकाणी चेक पोस्ट 

लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. यासाठी लोणावळा शहर आणि परिसरात तीन ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. मुंबईवरून येताना खंडाळा येथे पहिला चेक पोस्ट तर पुण्यावरून येताना कुमार चौकात दुसरा चेक पोस्ट आहे. तसेच भुशी डॅम आणि टायगर पॉईंटला सहारा ब्रिजवर देखील हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

( हेही वाचा : बेस्ट उपक्रमाचे वीजग्राहकांना आवाहन! बनावट SMS पासून सतर्क रहा)

मद्यापान करून हुल्लडबाजी घालणाऱ्या पर्यटकांवर तातडीने कारवाई करणार असल्याचा इशारा लोणावळा शहर पोलिसांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, पुणे आणि मुंबई येथून शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळ्यात जातात. पर्यटकांना पर्यटनस्थळी जाताना काळजी घेत शिस्त पाळावी असे आवाहन लोणावळा शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.