देशात सध्या प्रत्येकाच्या तोंडात एकाच चित्रपटाचे नाव आहे, तो चित्रपट म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’. या चित्रपटाची जोरदार चर्चा असली तरी यावरून वाद देखील निर्माण झाले आहेत. दरम्यान, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात 100 कोटींहून अधिकच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. या चित्रपटाचे कौतुक करताना एका चाहतीने चक्क तिच्या स्वत:च्या रक्ताने पोस्टर बनवले आगे. त्याचा फोटो विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटरवरून शेअर केला आहे.
विवेक अग्निहोत्रींचे ट्वीट
विवेक अग्निहोत्री यांनी अविश्वसनीय मला काय बोलावे ते समजत नाही… मंजू सोनीजींचे आभार कसे मानावे. तुमचे खूप खूप आभार. जर कोणी त्यांना ओळखत असाल, तर कृपया त्यांचा नंबर मला DM मध्ये शेअर करा. #RightToJustice असे ट्वीट केले आहे.
( हेही वाचा : मुंबईकरांनो वाहन घेऊन रविवारी बाहेर निघू नका, ‘या’ 13 रस्त्यांवर वाहतूक बंद! )
OMG. Unbelievable. I don’t know what to say… how to thank Manju Soni ji. @manjusoni Shat shat pranam. Gratitude.
If anyone knows her, pl share her contacts with me in DM. #RightToJustice pic.twitter.com/1jxsLDhCXq
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) March 24, 2022
चित्रपट प्रादेशिक भाषांमध्येही होणार डब
‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचे घर सोडावे लागले होते. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत इतरही काही नामवंत कलाकारांच्या भूमिका असून हा चित्रपट आता प्रादेशिक भाषांमध्येही डब केला जाणार आहे.
Join Our WhatsApp Community