भूमिगत कामात महापालिका नंबर वन! पण पवई-घाटकोपर जल बोगद्याचे काम अर्धवट रखडले

72

कोस्टल रोड आणि अमर महल जल बोगद्याचे काम युद्धपातळीवर करत भूमिगत जल बोगद्यांच्या कामांमध्ये मुंबई महापालिकेने वाखाणण्याजोगी कामे केली. भूमिगत कामात महापालिका नंबर वन अशा प्रकारची कौतुकाची थाप स्वतःच्या पाठीवर मारून घेणाऱ्या मुंबई महापालिकेला तब्बल दहा वर्षापूर्वी हाती घेतलेल्या जल बोगद्याचे काम अर्धवट सोडून देण्याची वेळ आली आहे. पवई ते वेरावली जलाशय हे काम पूर्ण झाले तरी पवई ते घाटकोपर जलाशय यादरम्यान भूमिगत जल बोगद्याचे काम होऊ शकले नाही. त्यामुळे हे काम २०१९ पासून बंद असून पुढील काम करण्यासाठी नवीन कंत्राटदाराचा शोध सुरू झाला आहे. त्यामुळे अर्धवट कामासाठी ३८ कोटी रुपयांची मांडवली करून कंत्राटदार आणि महापालिकेतील वाद संपुष्टात आणला जात असला तरी यामुळे मुंबईकरांना प्रेशरने येणाऱ्या पाण्यासाठी अजून वाट पाहायला लावली आहे.

(हेही वाचा – …म्हणून आगारांत एका जागी उभ्या असलेल्या ‘लालपरी’ ठरतायंत डोकेदुखी!)

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जल वाहिन्यांना बळकट करण्यासाठी महापालिकेच्यावतीने भूमिगत जल बोगद्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, सांताक्रुज-वांद्रे पश्चिम, कुर्ला आणि घाटकोपर या भागातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पवई ते वेरावली वेगामध्ये आणि पवई ते घाटकोपर तसेच पुढे घाटकोपर जलाशयाच्या जोडणाऱ्या भूमिगत जलबोगद्याचे काम हाती घेतले. सत्ताधारी शिवसेनेने आपल्या वाचननाम्यात या जलबोगदयाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे हे काम ८ डिसेंबर २०११ रोजी स्थायी समितीच्या मंजुरीने देण्यात आले. पटेल इंजिनिअरिंग या कंपनीला २२३.१५ कोटी रुपये देण्यात आले होते. पावसाळा धरून ५२ महिन्यांमध्ये हे करण्यात येणार होते. या कामाला १९ जानेवारी २०१२ मध्ये सुरू करण्यात आले. त्यामुळे हे काम १८ मे २०१६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु यातील तांत्रिक अडचणींमुळे या कामाचा कालावधी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आला होता. पण या कालावधीत हे काम पूर्ण करता आलेले नाही.

महापालिकेकडून आयटीच्या मदतीने एक तज्ञ समिती नेमणूक

हे काम सुरू असतानाच जून २०१६ मध्ये बोगदा खोदकामामध्ये अडचणी आल्या होत्या. त्यामुळे या कामाची गती मंदावली होती. त्यातच ऑगस्ट २०१९ मध्ये पवई येथील शिपिंग कॉपोरेशन ऑफ इंडियाच्या परिसरात जमीन खचून मोठा खड्डा निर्माण झाला होता. हा खड्डा खोदकाम झालेल्या लगतच्या जागेवर होता. हे काम ऑगस्ट २०११ पासून बंद आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेने आयटीच्या मदतीने एक तज्ञ समिती नेमली आणि याची सुरक्षेच्या दृष्टीने कोणती कामे करता येईल याचा अहवाल बनवला. त्यात जिथे बोगदा खणारे अडकले आहे. त्या ठिकाणापासून १२० मीटर अंतरावर भूस्तर परिस्थिती बोगदा खोदकामासाठी अनुकूल नाही असा अहवाल देण्यात आला. बोगदा खोदकामाची कामे करणे संयुक्तिक होणार नाही असा अहवाल दिला. ऑगस्ट २०२० मध्ये खोदकाम करणारे यंत्र या ठिकाणी अडकून पडले होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती आढळून आली. त्यातून पाण्याबरोबर ज्वालामुखीची राख वाहून आली त्यात मशिन गाढले गेले. अशा परिस्थिती बोगदा खोदणारे यंत्र पुन्हा सुरू करणे शक्य नाही म्हणून त्यांनी पुन्हा काम सुरू करणे अवघड असल्याचे सांगत हे काम बंद केले.

काम पूर्ण करण्यासाठी नवीन कंत्राटदार नेमणार

या कामासाठी २२३ कोटींचे कंत्राट असल्याने कंत्राटदाराने प्रथम १६७.७७ कोटी रुपयांचा दावा केला होता. रकमेपैंकी फेब्रुवारी २०१३ ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीतील ३४.३८ कोटी रुपयांचा दाव्याबाबत लवाद प्रक्रिया सुरु केला. मात्र पुढी कामासाठी १२०.२८ कोटी रुपयांच्या दाव्याची तडजोड करण्यास कंत्राटदार तयार झाला. त्यामुळे पटेल इंजिनिअरींग कंपनीला १६७.७७ कोटी रुपयांच्या दाव्यापैंकी ३८ कोटी रुपयांची रक्कम देण्यास आणि सर्व दावे मागे घेण्यास कंपनी तयार झाली आहे. त्यामुळे बोगद्याचे काम करत असताना उद्भवलेली प्रतिकूल भूगर्भीय परिस्थिती आणि या परिस्थितीमुळे टीबीएम तसेच त्याबाबतच्या साधन सामुग्री निष्क्रिय राहिल्याने कंत्राटदाचे झालेले नुकसान देण्यासाठी सल्लागारांनी ३८ कोटी रुपये देण्याची शिफारस केली. त्यामुळे ही रक्कम कंत्राटदाराला देऊन त्यांचे कंत्रात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अर्धवट असलेले पवई ते घाटकोपर जलबोगद्याचे काम पूर्ण करण्यासाठी नवीन कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी १४७.६८ कोटी रुपयंचा इतका खर्च अपेक्षित असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.