मुंबई महापालिकेने गोरगरीब मुंबईकरांसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक ही योजना सुरु केली आहे. पण, योजनेत असलेल्या एका दवाखान्यावर भूमाफियांनी ताबा मिळवला आहे. याठिकाणी भूमाफियांनी बाऊन्सर घुसवले आहेत. या बाऊन्सर्सना दवाखान्यातून हुसकावून लावा आणि सामान्य मुंबईकरांसाठी दवाखाना सुरु करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. त्यानंतर, बुधवारी महापालिकेच्यावतीने कारवाई होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने शहरातील विविध ठिकाणी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. मात्र, पवईतील तुंगा भागातील या क्लिनिकच्या जागेवर भूमाफियांनी ताबा मिळवला आहे. हे क्लिनिक बंद असून या जागेचा वापर होऊ नये यासाठी बाउन्सर नेमण्यात आले आहेत. पालिकेच्या या क्लिनिकवर इथल्या काही लोकांनी दावा करत या क्लिनिकला बाउन्सरच्यामार्फत टाळे ठोकले आहे. सध्या हे क्लिनिक बंद आहे. पवईतील पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( हेही वाचा: आंतरधर्मीय विवाहांसाठी आता समन्वय समिती; श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर सरकारचे पाऊल)
दवाखान्यात आजारांवर मोफत उपचार
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना योजनेअंतर्गत मुंबईतील 227 वाॅर्डमध्ये सरासरी एक दावाखाना असणार आहे. या दवाखान्यात आजारांवर मोफत उपचार होणार आहेत. त्याशिवाय रुग्णांच्या काही चाचण्यादेखील मोफत करण्यात येणार आहेत. सरासरी 25 हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना सुरु करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने काही भागांमध्ये हे दवाखाने सुरु केले आहेत. तर, काही ठिकाणी जागा निश्चित केल्या आहेत.
Join Our WhatsApp Community