परळ येथील वाडिया रुग्णालयात सोमवारी सायंकाळी अचानक वीज गेली. तब्बल तासाभरानंतर वीज पुन्हा आली. याबाबतचे छायाचित्र समाजमाध्यमांवर सायंकाळी चांगलेच व्हायरल होत होते. मात्र या प्रकरणात वाडिया रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. मिनी बोधानवाला यांनी घुमजाव करत रुग्णालयातील वीज गेली नसून, नजीकच्या भागांत सुरु असलेल्या कामाच्या परिसरात वीज गेल्याचे सांगितले.
( हेही वाचा : ‘बालकमंत्र्या’पासून सुटका, तीन वर्षांनंतर मुंबईला मिळाले खरे ‘पालकमंत्री’; अमित साटम यांची खरमरीत टीका)
नवजात बालकांच्या उपचारांसाठी तसेच प्रसूतीसाठी सार्वजनिक आणि खासगी प्रयोगतत्वावर वाडिया रुग्णालय सुरु आहे. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वाडिया रुग्णालयातील इमारतीतील वीज गेली. दोन्ही मजल्यांवरील वीज गेली होती. शस्त्रक्रिया तसेच बाह्य रुग्ण विभाग, रुग्णालयात दाखल रुग्णांना तपासणे इत्यादी कामे सकाळीच झाल्याने सायंकाळी रुग्णसेवेत गोंधळ उडाला नव्हता. वीजसेवा पुरवणा-या बेस्टकडून हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयातील खोल्यांमध्ये टॉर्च लावल्याचेही व्हायरल छायाचित्रांतून दिसून आले. साधारणतः पावणेआठच्या सुमारास रुग्णालयात वीज पुन्हा आली.
Join Our WhatsApp Community