करोडपती बनवणारी सरकारी योजना माहित आहे का?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करु इच्छिणा-या गुंतवणूकदारांसाठी एक चांगली योजना आहे. 15 वर्षांच्या परिपक्वता कालावधीमुळे ती दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देते. त्याचवेळी इतर सर्व योजनांच्या तुलनेत यावर व्याजदेखील चांगले मिळत आहे. पीपीएफ ही सरकारची गॅंरटीड रिटर्न स्कीम आहे. ज्याद्वारे तुम्ही करोडपतीदेखील बनू शकता. हे खाते जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफीसमध्ये उघडता येते.

व्याज आणि गुंतवणुकीचे फायदे

  • गेल्या काही वर्षांत पीपीएफवरील व्याज वेळोवेळी कमी झाले आहे, परंतु तरीही त्यावर वार्षिक 7.1 टक्के दराने परतावा मिळत आहे. विशेषत: कामगार वर्गात ही अतिशय लोकप्रिय योजना आहे.
  • बॅंकेच्या बचत खात्यात पैसे ठेवल्यास 3 ते 3.5 टक्के वार्षिक व्याज मिळत असले, तरी मुदत ठेवींचे म्हणजेच एफडीचे दरही तुलनेत कमी आहेत.
  • आणखी एक फायदा असा आहे की येथील परतावा इक्विटींप्रमाणे बाजाराशी जोडलेला नाही. अनिश्चिततेच्या परिस्थितीतही निश्चित व्याजानुसार परतावा दिला जाईल, तर भांडवली बाजारातील गुंतवणूक बुडवण्याचा धोका असतो. पोस्ट ऑफीस स्कीम असल्याने, येथे तुमची प्रत्येक ठेवदेखील सुरक्षित आहे.

( हेही वाचा: टायटॅनिक जहाज कसं बुडालं? वाचा टायटॅनिकची खरीखुरी स्टोरी… )

1 कोटी निधीसाठी किती मिळेल?

  • कमाल मासिक ठेव- रु. 12,500 ( वार्षिक 1.50)
  • व्याज दर वार्षिक -7.1 टक्के चक्रवाढ
  • 25 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर रक्कम – 1.03 कोटी रुपये
  • एकूण गुंतवणूक – रु. 37,50,000
  • व्याज लाभ-  रु. 65, 58, 015

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here