राज्याचे माजी मुख्यमंत्री (former Chief Minister) मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना राजकारणात आणणारे ज्येष्ठ आणि बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक प्रभाकर भूमकर (८४) (Prabhakar Bhumkar) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
मनोहर जोशी पहिल्यांदा मुंबईत आल्यानंतर दादर पूर्व, नायगांव येथील अहमद सेलर चाळीत रहावयास होते. तेथे त्यांचा संपर्क भूमकर यांच्याशी आला आणि तेव्हा भूमकर यांनी जोशींना शिवसेनेत प्रवेश द्यावा यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिफारस पत्र लिहिले. भूमकर हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतील शाखाप्रमुख असून बाळासाहेबांशी तसेच ज्येष्ठ शिवसेना नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.
(हेही वाचा-Manipur: मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात एके 56 रायफल, सिंगल बॅरल बंदूकसह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त)
शिवसेनेच्या स्थापनेपासून अनेक आंदोलनात सक्रिय असणारे भूमकर (Prabhakar Bhumkar) विभागात आणि शिवसैनिकांमध्ये भाऊ म्हणून परिचित होते. गेले काही महिने त्यांची तब्येत बरी नव्हती. अखेर शनिवारी रात्री त्यांच्या दादर पूर्व, नायगांव येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सुनील, मुलगी भारती, नातवंडे असा परिवार आहे.
Join Our WhatsApp Community