सातच्या बातम्यांचा ‘आवाज’ हरपला!

नमस्कार, आजच्या ठळक बातम्या, अशा भारदस्त आवाजात दूरदर्शनवरील बातमीपत्राची सुरूवात करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे मंगळवारी निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ोळख बनले होते.

१९७४ ते २०१६ पर्यंत वृत्तनिवेदक म्हणून काम केले

मुंबई दूरदर्शन केंद्रावरून म्हणजेच आत्ताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून गेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज प्रदीप भिडे यांच्या माध्यमातून हरपला आहे.  १९७४ ते अगदी २०१६ पर्यंत त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केले. ऑल इंडिया रेडिओ पुणे तसेच सह्याद्री बातम्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन भिडे यांच्या निधनासंदर्भातील माहिती देण्यात आली. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून त्या काळात ती सोडण्याचे धाडस भिडे यांनी दाखवले होते. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या नाट्यसंस्थेतून काही काळ नाटकांशी जोडले गेलेले आणि हजारो जाहिराती, माहितीपट-लघुपट यांचा ‘आवाज’ असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक-सूत्रसंचालक प्रदीप भिडे हे दूरदर्शनमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले होते.

(हेही वाचा तेच हॉटेल, तोच फॉर्म्युला, महाविकास आघाडी लागली कामाला…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here