दरमाह फक्त 55 रुपये भरा आणि मिळवा 3000 रुपये पेन्शन; कोणती आहे ‘ही’ Pension Scheme?

104

प्रत्येकाला भविष्याची चिंता असते. नोकरी किंवा व्यवसाय करताना ठराविक वेळेनंतर यासह वृद्धापकाळात आयुष्य कसं जगायचं त्यासाठी योग्य सेव्हींग करणे गरजेचे असते. यासाठी सरकार अनेक योजना आणत असतात. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेंतर्गत ६० वर्षांनंतर दरमहा ३००० रूपये किंवा वार्षिक ३६ हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद आहे.

काय आहे योजना

या योजनेद्वारे फक्त महिन्याचे ५५ रूपये जमा करावे लागणार असून महिन्याचे ३००० रूपये कमवता येणार आहेत. ३६ हजार रूपयांची पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना (PM SYM) ही पेन्शन स्किम असंघटीत क्षेत्रातील लोकांसाठी आहे. ज्यांना ३६ हजार रूपये पेन्शन दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ १८ ते ४० वर्ष वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात. या योजनेची रक्कम ही महिन्यात ३००० रूपये प्रमाणे दिली जाणार आहे. या योजनेत तुम्ही महिन्याला ५५ रूपयांपासून २०० रूपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

असे उघडा खाते 

  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत नोंदणी करण्यासाठी, कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट द्यावी लागेल. तेथे IFSC कोडसोबत आधार कार्ड, बचत खाते किंवा जन धन खात्याची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर नोंदणी होईल आणि खाते उघडले जाईल.
  • या योजनेत नामनिर्देशित व्यक्तीचे नाव देखील नोंदवले जाऊ शकते.
  • रजिस्ट्रेशननंतर तुम्हाला महिन्याचे किती पैसे भरावे लागतील याची माहिती मिळेल.
  • सुरुवातीला तुम्हाला रोख रकम द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुमचे खाते बनवण्यात येईल.
  • खाते उघडल्यानंतर श्रमयोगी कार्ड दिले जाते.
  • या योजनेत तुम्ही ५५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत महिन्याची गुंतवणूक करू शकतात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.