प्रशांत कारुळकर यांचा भारतीय नौदलाचे व्हाईस अॅडमिरल यांच्या हस्ते सन्मान 

84

प्रसिद्ध उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कारुळकर यांना भारतीय नौदलाचे व्हाईस अॅडमिरल यांच्याकडून सन्मानित करण्यात आले. व्हाइस अॅडमिरल एस. एन. घोरमाडे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भोपाळमध्ये लष्करी कमांडर यांची बैठक होत आहे. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित आहेत, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिल रोजी होणाऱ्या या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. त्याच्या दोन दिवस आधी मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजसेवक प्रशांत कारुळकर यांचा गौरव करण्यात आला. कारुळकर यांना यापूर्वीही विविध जागतिक दर्जाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम असोसिएशन’चे सदस्य होणारे पहिले भारतीय दाम्पत्य होण्याचा मानही प्रशांत कारुळकर आणि त्यांची पत्नी शीतल यांना मिळाला आहे.

(हेही वाचा राम नवमीच्या दिवशी पंढरपुरात झाले शुद्धीकरण; वाट चुकलेल्या तरुणाची झाली घरवापसी)

हा सन्मान मिळाल्यानंतर प्रशांत कारुळकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर आपल्या भावना व्यक्त केल्या, ‘मी सन्मानचिन्ह स्वीकारून कृतार्थ झालो आहे. भारतीय नौदलातील कमांडिंग अधिकाऱ्यांच्या दुस-या पंक्तीतील व्हाईस अॅडमिरल एस. एन. घोरमाडे यांच्या हस्ते भोपाळ येथे मला सन्मानित करण्यात आले. चाळीस वर्षांपासून देशाची सेवा करणारे नौदलातील द्वितीय क्रमांकाचे अधिकारी यांच्या हस्ते मला सन्मानित करण्यात आले. आम्ही समाजासाठी करत असलेल्या कामाचे व्हाइस अॅडमिरल यांनी कौतुक केले. हे सामान्य नागरिकासाठी अशक्य आहे, हा गौरव पाहून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

कारुळकर प्रतिष्ठानचे सेवा कार्य 

कारुळकर प्रतिष्ठान गेली 54 वर्षे लोकसेवा करत आहे. त्यांच्या सेवा कार्यामध्ये पालघर साधू हत्याकांडात प्राण गमावलेले वाहन चालक नीलेश तेलगडे यांच्या कुटुंबाला मदत करणे, कोविड-19 संक्रमणादरम्यान कोरोना रुग्णांना सर्व प्रकारची मदत करणे आणि इतर प्रशंसनीय कामांचा समावेश आहे. प्रशांत कारुळकर यांनी कोविड-19 मुळे बाधित रुग्णांना केलेल्या मदत कार्याबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स – लंडन, साउथ एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि इंडो-यूके कल्चरल फोरम यांनी सन्मानित केले आहे. यासोबतच त्यांना ‘साऊथ एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अवॉर्ड’नेही सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘इंडो यूके कल्चरल फोरम अवॉर्ड’ हा पुरस्कार दोन्ही देशांमधील मैत्रीचे प्रतीक आहे, जो दोन्ही देशांतील विशेष कार्य करणाऱ्या प्रतिभावंतांनाच दिला जातो. प्रशांत कारुळकर यांना हा सन्मानही देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.