स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि ५ अस्थायी विश्वस्तांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी रणजित सावरकर यांनी गुरुवार, २१ डिसेंबर रोजी हा निर्णय जाहीर केला.
या निवडणुकीसाठी इच्छूक लोकांकडून अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ डिसेंबर सायंकाळी ७ वाजेपर्यंत आणि अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती. अंतिम मुदतीनंतर प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची पडताळणी करून निवडणूक अधिकारी रणजित सावरकर यांनी २१ डिसेंबर रोजी हा निर्णय जाहीर केला. अध्यक्षपदी माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, तर अस्थायी विश्वस्त (आश्रयदाता विभाग) म्हणून सेवानिवृत्त एसीपी अविनाश धर्माधिकारी आणि शैलेंद्र चिखलकर यांची निवड झाली आहे. तर अस्थायी विश्वस्त (सामान्य विभाग) स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची नात असिलता सावरकर-राजे, तसेच श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार आणि हेमंत तांबट यांची निवड झाली आहे.
२३ डिसेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा
दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुरु होईल. सर्वांची निवड बिनविरोध झाल्याने या वेळी मतदान होणार नाही.
Join Our WhatsApp Community