स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित (Pravin Dixit) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्मारकाची रविवार, २२ डिसेंबरला सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी अधिकृतपणे याची घोषणा करण्यात आली.
वर्ष २०२४-२०२५ करिता अध्यक्षपदासाठी केवळ प्रवीण दीक्षित (Pravin Dixit) यांचेच आवेदन पत्र प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे प्रवीण दीक्षित यांची सलग चौथ्या वर्षी स्मारकाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने वीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या कार्यात प्रवीण दीक्षित (Pravin Dixit) यांचे दिशादर्शन मोलाचे असते.
Join Our WhatsApp Community